किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलइस्लामाबाद, ११ एप्रिल – भारताने बालाकोटमध्ये जैशच्या अड्ड्यावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर तब्बल ४३ दिवसांनी पाकिस्तान बुधवारी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना घटनास्थळी घेऊन गेले होते. भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील ज्या जाबा टेकडीच्या परिसरात हल्ला केला त्या भागातील परिस्थिती दाखवण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. पत्रकार आणि राजनैतिक अधिकार्यांना जाबा टेकडीवरील मदरशामध्ये नेण्यात आले त्यावेळी तिथे १०० ते १५० मुले शिक्षण घेत होती.
२६ फेब्रुवारीला भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये जणू काही घडलेच नाही हे दाखवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये जैशचा अड्डा उद्ध्वस्त झाला नाही, मग पाकिस्तानला पत्रकारांना घटनास्थळी घेऊन जायला दीड महिना का लागला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार जाबा टेकडीवरील तो एक साधा मदरसा होता. जिथे धार्मिक शिक्षण दिले जाते. मदरशाच्या भेटीच्या वेळी इतका लष्करी फौजफाटा तिथे का होता, असाही प्रश्न उद्भवला आहे.
हवाई हल्ला झाल्यावर दुसर्याच दिवशी पत्रकारांना घटनास्थळी का जाऊ दिले नाही? हल्ल्यानंतर नवव्या दिवशीसुद्धा रॉयटर्सच्या पत्रकारांना घटनास्थळी जाण्यापासून का रोखण्यात आले? जर नुकसानच झाले नाही मग पाकिस्तान इतके दिवस काय लपवत होता? या प्रश्नांची उत्तरे पाकिस्तानकडे आहेत का? हवाई हल्ल्याबद्दल संशय घेणारी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे या विषयाच्या मुळाशी जाणार आहेत का, असे प्रश्न निर्माण होत आहेत.
पाकिस्तानने ज्या पत्रकारांना घटनास्थळी नेले होते त्यांना स्थानिकांशी जास्त वेळ बोलू नका, असे निर्देश दिले होते. बीबीसीच्या पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते असिफ गफुर बाजवा यांना, इथे आणण्यासाठी इतका उशीर का केला, असा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी वेळ मारून नेणारे उत्तर दिले. घटना वेगाने घडत होत्या आणि परिस्थिती तणावग्रस्त होती, त्यामुळे आम्हाला वेळ मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले. पत्रकार जेव्हा स्थानिकांशी बोलत होते त्यावेळी पाकिस्तानी लष्कराचे अत्यंत बारीक लक्ष होते, असे बीबीसीच्या पत्रकारानेच म्हटले आहे.
पाकिस्तानने भलेही आंतरराष्ट्रीय पत्रकार आणि राजनैतिक अधिकार्यांना बालाकोटच्या जाबा टेकड्यांची सफर घडवली असेल, पण त्यासाठी ४३ दिवस का लागले, या प्रश्नाचे उत्तर नाही. पत्रकारांना जो मदरसा दाखवण्यात आला तो अत्यंत दुर्गम भागात आहे. पत्रकार हेलिकॉप्टरने उतरल्यानंतर दीड तास पायपीट करून जाबा टेकडीवर पोहोचले. मुख्य नागरी वस्तीपासून हा भाग खूप दूर असल्यामुळे दहशतवादी प्रशिक्षणासाठी ही अत्यंत योग्य आणि मोक्याची जागा आहे. त्यामुळे तिथे जैशचा अड्डा होता हा भारताचा दावा शंभर टक्के खरा आहे.
उलट भारतीय हवाई दलाने जंगलात इतक्या आतमध्ये असलेल्या भागात लक्ष्यावर अचूक प्रहार करून आपली क्षमता दाखवून दिली. अतिरेक्यांना तुम्ही आमच्यापासून लपवू शकत नाही हेच भारताने आपल्या कारवाईतून सिद्ध केले. हवाई हल्ल्यावर संशय घेणार्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.