किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलपंतप्रधानांनी दिली ऐतिहासिक दिवसाची उपमा,
लंडन, ८ डिसेंबर – ब्रिटनमध्ये आज, मंगळवारपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून, पहिल्यांदाच लस घेणार्या काही मोजक्या लोकांमध्ये ८७ वर्षीय भारतीय वंशाचे हरी शुक्ला यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या देशात लस घेणे सक्तीचे नसून ऐच्छिक असल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.
माहितीनुसार, मागील आठवड्यात ब्रिटनने फायझर कंपनीच्या लशीला मंजुरी देत सर्वांसाठी लस उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली होती. आता सर्व चाचण्या पार पाडल्यानंतर आवश्यक मंजुरी मिळवून लसीकरण मोहीम सुरू करणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. मंगळवारी ब्रिटनमध्ये व्ही-डे अर्थात व्हॅक्सिन-डे अंतर्गत लसीकरण सुरू करण्यात आले. हा दिवस ऐतिहासिक असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात वयस्कर मंडळी, आरोग्य कर्मचारी, आरोग्य क्षेत्रातील स्वयंसेवक आदींना लस उपलब्ध करण्यात येईल. याशिवाय ८० वर्षे व त्याहून अधिक वय, त्यानंतर ७५ वर्षे व त्याहून अधिक वय, ६५ वर्षे व त्याहून अधिक वय, ६० व त्याहून अधिक वय असलेल्या वयोगटातील व्यक्तींना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. याशिवाय १६ ते ६४ वर्षे वयोगटात संसर्ग होण्याची अधिक शक्यता असलेल्यांनाही लस उपलब्ध केली जाईल.
दरम्यान, मूळ भारतीय हरी शुक्ला यांना न्यू कॅ सल येथील एका रुग्णालयात फायझर-बायोएनटेकने विकसित केलेली लस देण्यात येणार आहे. लस टोचून घेणे हे कर्तव्य असल्याची भावना शुक्ला यांनी व्यक्त केली आहे.