किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलबीजिंग, ८ डिसेंबर – भारताच्या पावलावर पाऊल ठेवत आता चीननेही ‘डिजिटल स्ट्राईक’ केले. चीन सरकारने अमेरिकेसह अन्य काही देशांमधील १०५ ऍप्सवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. हे सर्व ऍप्स तत्काळ स्टोअरवरूनही हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गलवान खोर्यातील भीषण संघर्षानंतर भारताने चीनवर तीन वेळा ‘डिजिटल स्ट्राईक’ केले. या अंतर्गत भारताने आतापर्यंत चीनच्या २२० मोबाईल ऍप्सवर बंदी घातली आहे. यात टिकटॉक, पबजी आणि यूसी ब्राऊझर यासारख्या प्रसिद्ध ऍप्सचा समावेश आहे. चीनने अमेरिकेची ट्रॅव्हल कंपनी ट्रिपऍडव्हायझरसह इतर काही देशांचे १०५ ऍप्स आपल्या ऍप स्टोअर्सवरून हटविले आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या ऍप्सवर अश्लील साहित्य, वेश्यावृत्ती, जुगार आणि हिंसक गोष्टी पसरविण्याचा आरोप आहे. चीनच्या सायबरस्पेस प्रशासनाने आज मंगळवारी आपल्या वेबसाईटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या सर्व ऍप्सने एकापेक्षा अधिक वेळा सायबर कायद्याचे उलंघन केले आहे.