|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.99° C

कमाल तापमान : 30.17° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 66 %

वायू वेग : 3.22 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Saturday, 18 May

29.17°C - 30.5°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 19 May

28.94°C - 30.35°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

29.02°C - 30.82°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.93°C - 30.11°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.89°C - 30.04°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

29.11°C - 29.97°C

broken clouds
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » ब्रिटनमध्ये फायझरवर सायबर हल्ला

ब्रिटनमध्ये फायझरवर सायबर हल्ला

लंडन, १० डिसेंबर – जगभरात कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी लस बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही कंपन्या ही लस बनविण्यात यशस्वी झाल्या असून ब्रिटनने आपत्कालीन लसीकरणही सुरू केले आहे.
फायझर व बायोएनटेकने ब्रिटनमध्ये ज्या सरकारी संस्थेला कोरोना लसीसाठी मंजुरी अर्ज पाठविला होता, तिथे सायबर हल्ला झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. या संस्थेतून हॅकर्सनी कोरोना लसीसंदर्भात गोपनीय माहिती चोरण्याचा प्रयत्न केला आहे.
लसीसंदर्भातच्या दस्तावेजांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांचा प्रयत्न फसला आहे, असे फायझर व बायोएनटेकने म्हटले आहे.
आमच्या खाजगी डेटापर्यंत कोणी पोहोचल्याचे आढळले नाही. युरोपीय मेडिसिन एजन्सी या सायबर हल्ल्याची समीक्षा करणार असून त्याकरिता अधिक वेळ लागणार नसल्याचे आश्‍वासन एजन्सीने दिल्याचेही कंपनीने सांगितले. युरोपीय औषधोपचार एजन्सी (ईएमए) युरोपीय संघासाठी औषधांचे आणि लसींचे परीक्षण करते. या संस्थेवरच हा हल्ला झाला आहे.
इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्समध्ये आहे. तसेच इंटरपोलचे १९४ देश सदस्य आहेत. या सर्व देशांना इंटरपोलने सावध राहण्याचा व या संघटित गुन्हेगारांचे हल्ले परतवून लावण्यासाठी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.
ब्रिटनमध्ये फायझरची लस देण्यात येत आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ब्रिटनकडून कोरोनाच्या आठ लाख मात्रांचा वापर करण्यात येणार आहे. मात्र नाताळपर्यंत देशामध्ये कोरोनाच्या लसीचे लाखो मात्रा उपलब्ध होतील, असे ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी सांगितले.

Posted by : | on : 10 Dec 2020
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g