|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.24° C

कमाल तापमान : 31.74° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 64 %

वायू वेग : 2.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.74° C

Weather Forecast for
Saturday, 18 May

29.29°C - 31.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 19 May

28.83°C - 30.34°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

29.07°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

29.08°C - 30.12°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.84°C - 30.05°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.85°C - 29.78°C

broken clouds
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » ऑक्सफर्ड लस सुरक्षित, प्रभावी असल्याचा दावा

ऑक्सफर्ड लस सुरक्षित, प्रभावी असल्याचा दावा

स्वस्त दरात उपलब्ध होणार,
लंडन, ९ डिसेंबर – ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाने विकसित केलेल्या लशीच्या चाचणीचे अंतिम निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले असून, ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या थैमानाने हतबल झालेल्या जगासाठी, मुख्यत्वे भारतासाठीही दिलासादायक बातमी समोर आली आहे.
द लॅसेन्ट या नियतकालिकामध्ये प्रकाशित संशोधनानुसार, दोन पूर्ण डोस दिल्यानंतर लस ६२ टक्के प्रभावी आहे. तर, प्रारंभी अर्धा डोस आणि नंतर पूर्ण डोस दिल्यानंतर ही लस ९० टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये २३ हजार ७४५ जणांवर लस चाचणी करण्यात आली. यातील ८२ टक्के स्वयंसेवक १८ ते ५५ वर्षे वयोगटातील होते. चाचणीत ५६ वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील लोकांना नंतरच्या दिवसांत सहभागी करण्यात आले. तसेच, ५६ व त्याहून अधिक वयोगटातील लोकांच्या चाचणीच्या माहितीचे विश्‍लेषण करण्यात आले नसल्याचे ऑक्सफर्डने स्पष्ट केले आहे.
ब्रिटनमध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. ऑक्सफर्ड लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्याने पुढील काही दिवसांत लशीला मंजुरी मिळेल, असा विश्‍वास ऑक्सफर्डचे लस तज्ज्ञ प्रा. सारा गिल्बर्ट यांनी व्यक्त केला. ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाच्या लशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणे शक्य आहे. शिवाय फायझर, मॉडर्नापेक्षाही कमी दरात उपलब्ध होणार असल्यामुळे अनेक देशांचे याकडे लक्ष लागले असल्याचे प्रा. गिल्बर्ट यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 9 Dec 2020
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g