किमान तापमान : 29.6° C
कमाल तापमान : 31.19° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 75 %
वायू वेग : 2.26 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.19° C
28.55°C - 31.99°C
scattered clouds28.46°C - 30.36°C
scattered clouds28.75°C - 29.85°C
scattered clouds28.52°C - 29.74°C
broken clouds28.56°C - 30.53°C
light rain28.67°C - 30.1°C
light rain९६ देशांमधील ३३ लाख खात्यांचा समावेश,
नवी दिल्ली/बर्न, ११ ऑक्टोबर –
स्विस बँकेकडून भारताला तेथील भारतीय बँक खातेधारकांची तिसरी यादी सादर केली आहे. यात ९६ देशांमधील ३३ लाख खात्यांचा समावेश आहे. स्वित्झर्लंडच्या फेडरल कर प्रशासन अर्थात् एफटीएने आज सोमवारी याबाबतची माहिती दिली.
दरवर्षी स्विस बँकेकडून भारताला विदेशात काळा पैसा जमा करणार्या नागरिकांची यादी दिली जाते. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून ही यादी अलिकडेच भारताकडे सोपवली आहे. यावेळी दहा अतिरिक्त देशांमधील भारतीयांची माहिती देण्यात आली आहे. यात अँटिग्वा आणि बारबुडा, अझरबैझान, डॉमिनिका, घाना, लेबनॉन, मकाऊ, पाकिस्तान, कतार, सामोआ आणि वाऊतू या देशांचा समावेश आहे.
काही देश याबाबतच्या करारात समाविष्ट नसल्याने, त्यांच्याकडील माहिती मात्र भारताला उपलब्ध करण्यात आलेली नाही. ज्या ९६ देेशांमधील भारतीय खातेदारांची यादी स्विस बँकेने सोपवली आहे, त्यातील कोणत्याही नागरिकाचे नाव मात्र जाहीर करण्यात आलेले नाही, यात असंख्य व्यक्तिगत आणि कंपन्यांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सलग तिसरे वर्ष
स्वित्झर्लंडसोबत भारताने करार केल्यानंतर विदेशात काळा पैसा जमा करणार्या नागरिकांची यादी प्राप्त होण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. भारतीयांच्या नावांची पहिली यादी सप्टेंबर २०१९ मध्ये सोपविण्यात आली होती. यात ७५ देशांमधील खातेदारांचा समावेश होता. त्यानंतर गेल्या वर्षी याच महिन्यात ८६ देशांमधील खातेदारांची यादी सोपविण्यात आली होती.
अनिवासी भारतीयांची संख्या जास्त
स्विस बँकेकडून सोपविण्यात आलेल्या या यादीत बडे व्यावसायिक आणि बहुतांश अनिवासी भारतीयांचा समावेश असल्याची माहिती या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी दिली. यातील बहुतांश लोक दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये वास्तव्यास आहेत. याशिवाय, अमेरिका आणि ब्रिटनसह काही आफ्रिकन देशांमधील नागरिकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, कोणत्या नागरिकाचे आणि कंपनीचे कोणत्या बँकेत किती पैसे आहेत, त्याचे नाव, पत्ता आणि सध्या ते कोणत्या देशात स्थायिक झाले आहेत, याची माहितीदेखील यादीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.