|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.6° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 2.26 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.55°C - 32.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.46°C - 30.36°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.75°C - 29.85°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.52°C - 29.74°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.56°C - 30.53°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.67°C - 30.1°C

light rain
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » कोरोना प्रतिबंधक गोळीला ब्रिटनची मान्यता

कोरोना प्रतिबंधक गोळीला ब्रिटनची मान्यता

अमेरिकेत होणार ३० ला बैठक,
लंडन, ५ नोव्हेंबर – औषधनिर्माण क्षेत्रातील कंपनी मर्कच्या कोरोना प्रतिबंधक औषधाला ब्रिटनने मंजुरी दिली आहे. हे औषध गोळी स्वरूपात आहे. आतापर्यंत कोरोनाच्या उपचारात इंजेक्शन द्यावे लागत होते. त्यामुळे जगातील पहिल्या कोरोना प्रतिबंधक गोळीला मान्यता देणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला आहे.
अमेरिकेच्या मर्क व रिजबॅक बायोथेराप्यूटिकने संयुक्तपणे हे औषध विकसित केले आहे. ब्रिटनच्या मेडिकल व हेल्थकेअर प्रोडक्ट रेग्युलेटरी एजन्सी एमएचआरए मोलोनुपिरावीरच्या वापरास परवानगी दिली असून, ब्रिटनमध्ये हे औषध लागेब्रायो नावाने विकले जाणार आहे. या औषधाचा वापर कोरोनाचे हलके आणि गंभीर प्रकारचे संक्रमण असलेल्यासाठी होणार आहे.
कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर हे औषध देता येईल. या संदर्भात ३० नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील सल्लागारांची एक बैठक होणार असून, त्यात या औषधाची सुरक्षा व प्रभावीपणा यावर समीक्षा केली जाणार आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या एफडीएकडे कंपनीने या औषधाच्या वापरला मान्यता मागितली होती. त्याला मंजुरी मिळाली आहे.
मर्कचे सीईओ आणि अध्यक्ष रोबर्ट डेव्हीस म्हणाले की, कोरोनासाठी हे महत्त्वाचे औषध ठरेल आणि जागतिक पातळीवर त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. या गोळीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या अमेरिका, ब्राझील, इटली, जपान, द. आफ्रिका, तैवान व ग्वाटेमाला येथे घेतल्या जात असून, साईटवर हे परीक्षण सुरू आहे असेही समजते.

Posted by : | on : 6 Nov 2021
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g