|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.6° C

कमाल तापमान : 31.19° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 75 %

वायू वेग : 2.26 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.19° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.55°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.46°C - 30.36°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.75°C - 29.85°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.52°C - 29.74°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.56°C - 30.53°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.67°C - 30.1°C

light rain
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » कोव्हिशिल्डमुळे ‘डेल्टा’च्या मृत्यूपासून ९० टक्के संरक्षण

कोव्हिशिल्डमुळे ‘डेल्टा’च्या मृत्यूपासून ९० टक्के संरक्षण

लंडन, २१ ऑक्टोबर – घातक समजल्या जाणार्‍या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने होणार्‍या मृत्यूपासून कोव्हिशिल्डच्या दोन मात्रा आणि फायझरच्या लसीमुळे ९० टक्के संरक्षण मिळू शकते, असा न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये मंगळवारी प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे.
या अभ्यासासाठी कोरोनावर नजर ठेवणार्‍या स्कॉटलंड-वाईड ईएव्हीए-२ या मंचाच्या डेटाचा वापर करण्यात आला. डेल्टामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचा हा घातक व्हेरिएंट आढळला आहे, असे या अभ्यासात म्हटले आहे.
एडिनबर्ग आणि स्ट्रॅचलाइड विद्यापीठ, स्कॉटलंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १ एप्रिल आणि २७ सप्टेंबरदरम्यान स्कॉटलंडमधील ५४ लाख नागरिकांच्या डेटाचे विश्‍लेषण केले. या कालावधीत १,१५,००० बाधित आढळले, तसेच २०१ जणांचा मृत्यू झाला होता. फायझरची बायोएनटेकमुळे डेल्टाच्या मृत्यूपासून ९० टक्के, तर भारतातील कोव्हिशिल्डच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना ९१ टक्के संरक्षण मिळत असल्याचे विश्‍लेषणात निष्पन्न झाल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.
डेल्टा व्हेरिएंट कित्येक देशांमध्ये आढळला आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या इतर व्हेरिएंट्‌सच्या तुलनेत डेल्टा घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. लसीकरणामुळे या व्हेरिएंटपासून सुरक्षा मिळत असल्याचे अभ्यासात सिद्ध झाले आहे, असे एडिनबर्ग विद्यापीठाच्या अशर संस्थेचे संचालक आणि संशोधनप्रमुख प्रोफेसर अझीझ शेख यांनी सांगितले. कुणी अद्याप लस घेतली नसेल, तर या व्हेरिएंटपासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Posted by : | on : 22 Oct 2021
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g