|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.39° C

कमाल तापमान : 32.46° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 73 %

वायू वेग : 5.98 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.46° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.76°C - 32.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.46°C - 30.81°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.71°C - 30.34°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.52°C - 30.28°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.5°C - 30.95°C

overcast clouds
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.71°C - 30.51°C

light rain
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » ब्रिटनच्या मान्यताप्राप्त यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश

ब्रिटनच्या मान्यताप्राप्त यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश

लंडन, ९ नोव्हेंबर – भारतात विकसित झालेल्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीचा ब्रिटनने त्यांच्या मान्यताप्राप्त लसींच्या यादीत समावेश केला असून, कोव्हॅक्सिनची लस घेणार्‍या नागरिकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. ही लस घेणारी व्यक्ती आता कोणत्याही अडथळ्यांविना ब्रिटनला जाऊ शकणार आहे. इतकेच काय, त्यांना इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर विलगीकरणाची आवश्यकता राहणार नाही.
ब्रिटनचा हा नियम २२ नोव्हेंबरपासून अंमलात येणार आहे. भारताच्या कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्यानंतर ब्रिटनने या लसीला प्रतीक्षा यादीतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात सर्वाधिक वापरल्या जात असलेल्या लसींमध्ये कोव्हॅक्सिन दुसर्‍या क्रमांकावर आहे.
ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त ऍलेक्स एलिस यांनी सोमवारी सायंकाळी याबाबतचे ट्विट केले. यात त्यांनी म्हटले आहे की, ब्रिटनला जाणार्‍या भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या २२ नोव्हेंबरपासून कोव्हॅक्सिन लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना ब्रिटनमध्ये दाखल झाल्यानंतर विलगीकरणात राहण्याची आवश्यकता राहणार नाही.
हैदराबादच्या भारत बायोटेक या कंपनीच्या कोव्हॅक्सिन लसीला आता जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाली आहे. कोव्हॅक्सिन ही भारताने देशातच विकसित केलेली लस आहे. वर्षभरापूर्वी भारत सरकारच्या औषध महानियंत्रकांनी या लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी दिली होती. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने कोव्हॅक्सिन लसीला परवानगी दिली होती. तेथे जाणार्‍यांनाही आता ही लस घेतली असल्यास विलगीकरणात राहण्याची गरज पडणार नाही.

Posted by : | on : 9 Nov 2021
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g