|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.65° C

कमाल तापमान : 33.21° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 5.41 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.21° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.72°C - 33.99°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.59°C - 30.85°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.63°C - 30.61°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.59°C - 30.22°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.52°C - 30.88°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.92°C - 30.67°C

light rain
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » इटली दौर्‍यावर पंतप्रधान मोदींनी मराठीत साधला संवाद

इटली दौर्‍यावर पंतप्रधान मोदींनी मराठीत साधला संवाद

रोम, २९ ऑक्टोबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या दौर्‍यावर इटलीत दाखल झाले. आज शुक्रवारी त्यांनी रोममधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले. यानंतर भारतीय समुदायाने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी काही महिलांनी संस्कृतमधून श्‍लोक म्हटले. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींनी इटलीत वास्तव्यास असलेल्या नागपूरच्या माही गुरुजींशी चक्क मराठीत संवाद साधला.
एका महिलेने मोदींना ‘केम छो…’म्हटल्यावर तिच्याशी गुजरातीत संवाद साधला. माही गुरुजी ऊर्फ महिंद्र सिरसाठ हे मूळचे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील साहेबराव सिरसाठ हे नागपूर पोलिस दलात एएसआय पदावरून निवृत्त झाले. त्यांचे कुटुंब सीताबर्डी येथील क्वार्टरमध्ये राहात होते. २५ वर्षांपूर्वी काही कामानिमित्त ते इटलीला गेले होते. त्यावेळी या देशातही भारतीय संस्कृती आणि आयुर्वेद उपचार पद्धतीचा प्रचार व्हावा, असे त्यांना वाटले. तेव्हापासून त्यांनी भारत सोडून इटलीत आपले कार्य सुरू केले. मागील २५ वर्षांपासून इटलीच नव्हे तर युरोपीय देशांमध्ये ते आयुर्वेदिक उपचार पद्धतीसह योग आणि अध्यात्माचा प्रचार, प्रसार करत आहेत. कोरोना काळातही ते कोरोनापासून सुरक्षित राहिले. या कालावधीत त्यांनी इटलीतील नागरिकांना योग आणि आयुर्वेदाची सेवाही दिली.

Posted by : | on : 30 Oct 2021
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g