Home » ठळक बातम्या, विज्ञान भारती » नव्या वर्षात येणार ‘ड्रायव्हरलेस कार’

नव्या वर्षात येणार ‘ड्रायव्हरलेस कार’

Gov. Brown Signs Legislation At Google HQ That Allows Testing Of Autonomous Vehiclesन्यूयॉर्क, [२५ डिसेंबर] – सरत्या वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिलेली ‘गूगल’ची ‘ड्रायव्हरलेस’ अर्थात चालकविरहित कार नव्या वर्षात बाजारपेठेत धडकणार आहे. इंटरनेटवरील आघाडीचे सर्च इंजिन असणार्‍या ‘गूगल’ने गेल्या दोन दिवसात या अनोख्या कारची छायाचित्रे विविध संकेतस्थळांवर पोस्ट केली आहेत. त्यानुसार ही कार साधारणपणे गोलाकार असणार आहे. पुढील वर्षी साधारणतः मे महिन्यात ही कार बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नव्या वर्षाच्या सुरुवातीला ही कार इंग्लंडच्या रस्त्यांवर धावताना दिसणार आहे. मात्र, त्याआधी या गाडीच्या आणखी काही चाचण्या केल्या जाणार असल्याचे ‘गूगल’ने स्पष्ट केले आहे. याच वर्षीच्या मे महिन्यात गूगलने या कारचे प्रारूप जगापुढे आणले होते. तोपर्यंत चालकाशिवाय चालू शकणारी गाडी ही केवळ कल्पनाच होती. मात्र, प्रारूप आणि आताच्या कारमध्ये बरेच मूलभूत फरक करण्यात आले असून त्यात ‘सेल्फ ड्राइव्ह’ उपकरणांचा भरपूर वापर करण्यात आला आहे.
त्यात सेन्सर आणि मध्यवर्ती कम्प्युटरचा समावेश असून सध्या अशी सुविधा केवळ लेक्ससच्या एसयूव्ही आणि टोयोटाच्या ‘प्रियस’ या गाड्यांमध्येच उपलब्ध आहे. याशिवाय, या गाडीत सेल्फ ड्रायव्हिंगसाठी उपयुक्त‘लेझर स्टिअरिंग’चा समावेश आहे. कंपनी पहिल्या टप्प्यात अशा १०० गाड्या बाजारात आणेल. या गाड्यांमध्ये स्टिअरिंग नसून त्याऐवजी ‘स्टॉप’ आणि ‘गो’ अशी दोन बटने आहेत. शिवाय, दिशादर्शन करण्यासाठी जीपीएस, सेन्सर आणि कॅमेरा डेटाची सोय आहे. गूगलच्या या प्रकल्पाचा प्रमुख ख्रिस उमर्सन याने या गाडीचे उत्पादन करून विक्री करण्यात ‘गूगल’ला रस नसल्याचे म्हटले आहे. या गाडीत बसून फक्त फिरण्याचा आनंद घ्यायचा आहे. कोणत्याही प्रकारचे स्टिअरिंग नाही की पेडल नाही. काहीच न करता आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाण्याचे स्वातंत्र्य आणि आनंद खूप महत्त्वाचा आहे, असे मत ‘गूगल’चे सहसंस्थापक सर्जी ब्रिन यांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19279

Posted by on Dec 26 2014. Filed under ठळक बातम्या, विज्ञान भारती. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विज्ञान भारती (2304 of 2466 articles)


=नड्डा, सहस्रबुद्धे झारखंडचे निरीक्षक= नवी दिल्ली, [२४ डिसेंबर] - स्पष्ट बहुमत प्राप्त झालेल्या झारखंडमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय ...

×