Home » उ.खंड, ठळक बातम्या, राज्य » स्टिंग ऑपरेशनमुळे मुख्यमंत्री हरीश रावत अडचणीत

स्टिंग ऑपरेशनमुळे मुख्यमंत्री हरीश रावत अडचणीत

harish rawatनवी दिल्ली, [२६ मार्च] – घोडेबाजाराचे स्टिंग ऑपरेशन असलेली सीडी कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांनी आज जारी केल्यामुळे आधीच अडचणीत असलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत आणखी अडचणीत आले आहेत. दरम्यान, भाजपाने आज रात्री राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेत हरीश रावत सरकार बरखास्त करण्याच्या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
विश्‍वासमत पारित करण्यासाठी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सोमवार २८ मार्चला विधानसभेची विशेष बैठक बोलावली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आपले सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री रावत आमदारांना पैशाचे आमिष दाखवत असल्याच्या स्टिंग ऑपरेशनची एक सीडी दिल्लीत आयोजित पत्रपरिषदेत बंडखोर कॉंग्रेस नेते हरकसिंह रावत, विजय बहुगुणा यांचे पुत्र साकेत बहुगुणा आणि आमदार कुंवरप्रणवसिंह यांनी जारी केली. मुख्यमंत्री रावत आपले सरकार वाचवण्यासाठी आमदारांची खरेदी करीत आहेत, हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे रावत सरकार बरखास्त करण्याची मागणीही या नेत्यांनी केली.
पैशाचे आमिष दाखवत बंडखोर कॉंग्रेस आमदार तसेच काही भाजपा आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करीत असून आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. आमच्या जिवाला गंभीर धोका असल्याचा आरोपही हरकसिंह रावत यांनी केला आहे. आम्हाला केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी, अशी मागणीही रावत यांनी केली. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून हरीश रावत सरकार बरखास्त करून राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी हरकसिंह रावत यांनी केली.
दरम्यान, स्टिंग ऑपरेशनच्या या सीडीमुळे कॉंग्रेस नेते अडचणीत आले आहेत. ही सीडी बनावट असून आपली प्रतिमा मलिन करण्याचा कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांचा हा प्रयत्न असल्याचा आरोप मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केला आहे. या सीडीशी आपला दुरान्वयानेही संबंध नसल्याचा दावा रावत यांनी केला आहे. सत्यता पडताळून पाहण्यासाठी सीडीची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री रावत यांनी केली आहे.
पक्षांतरबंदी कायद्यानुसार विधानसभेचे सभापती गोविंदसिंह कुंजवाल यांनी कॉंग्रेसच्या ९ बंडखोर आमदारांवर बजावलेल्या नोटिसवर उत्तर देण्याची मुदत आज सायंकाळी संपली. त्यामुळे आता सभापती या बंडखोर आमदारांवर कोणती कारवाई करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या नोटिसीला उत्तर देण्यासाठी आपल्याला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी बंडखोर आमदारांनी एका याचिकेतून उच्च न्यायालयात केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे बंडखोर कॉंग्रेस आमदारांना धक्का बसला होता.
विधानसभेच्या सभापतींनी कॉंग्रेसच्या ९ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले तर सोमवार २८ मार्चला विश्‍वासमत प्रस्तावावरील मतदानाच्या वेळी विधानसभेत प्रचंड गदारोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27593

Posted by on Mar 27 2016. Filed under उ.खंड, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.खंड, ठळक बातम्या, राज्य (564 of 2452 articles)


नवी दिल्ली, [२६ मार्च] - यापुढे प्रत्येक ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ९० आरक्षित लोअर बर्थ असतील, अशी घोषणा रेल्वे बोर्डातर्फे नुकतीच ...

×