Home » प्रहार : दिलीप धारूरकर, संवाद, स्तंभलेखक » मानसिक संतुलन बिघडलेले मोदी-विरोधक!

मानसिक संतुलन बिघडलेले मोदी-विरोधक!

प्रहार : दिलीप धारूरकर

आता लोकांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी, हाच एकमेव पर्याय आहे, असे दिसत आहे. तीन प्रकारे ही अनुकूलता समोर येते आहे : एक- मोदी जातील तेथे प्रचंड, अभूतपूर्व गर्दीच्या विराट सभा, प्रचंड उत्साह दिसतो आहे. दुसरे- सगळ्या सर्वेक्षणांत वरचेवर मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांची लोकप्रियता वाढताना दिसते आहे. तिसरे म्हणजे- एम. जे. अकबर, किरण बेदी, सत्‌पाल महाराज, चेतन भगत अशा कितीतरी विचारवंत, विरोधक, कलाकार, तटस्थ मंडळी यांचा पाठिंबा भारतीय जनता पक्षाला मिळतो आहे. अनेक छोटे पक्ष भाजपाशी निवडणूकपूर्व मैत्री करायला उत्सुक आहेत. अगदी तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांमध्येही भारतीय जनता पक्षाबाबत उत्सुकता आणि मैत्री करण्याबाबत उत्साह आहे. मात्र, या वातावरणामुळे कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी यांचा जळफळाट होतो आहे. सत्तेविना कॉंग्रेस, ही कल्पनाच कॉंग्रेसजनांना अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे ते निकराचा विरोध करण्याच्या भूमिकेत आहेत. भारतात अराजक निर्माण करण्याचा विडा उचलून, परदेशी इशार्‍याने काम करणारे आम आदमी पार्टी, केजरीवाल यांना देशात राष्ट्रभक्ती, समाजप्रेम, शिस्त यावर आधारलेले विकासोन्मुख स्थिर सरकार नको आहे. त्यामुळे ही सर्व मंडळी निकराचा प्रयत्न करत, नरेंद्र मोदी यांना बदनाम करायचे, खोटेनाटे आरोप करायचे, तीव्र शब्दांचा वापर करत तेजोभंग करण्याचा प्रयत्न करायचा, असे प्रकार आता मतदानापर्यंत वाढत जाणार आहेत.
लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे नरेंद्र मोदी यांच्या विरोधाचा गंडा बांधलेल्या लोकांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. कॉंग्रेसजवळ मुद्देच नसल्यामुळे, ते वारंवार २००२ च्या गुजरात दंगलींचा विषय उकरून काढण्याच्या प्रयत्नात आहेत. नुकतेच कॉंग्रेसचे प्रवक्ते शक्तिसिंह गोहेल यांनी, ‘नरेंद्र मोदी हे ‘मौत का सौदागर’ आहेत,’ असा पूर्वी सोनिया गांधी यांनी केलेला आरोप पुन्हा केला आहे. अरविंद केजरीवाल हे तर गुजरातचा अवघ्या तीन दिवसांचा दौरा करून, गुजरातमधला विकास खोटा असल्याचे, नव्हे, गुजरातमध्ये अंबानीच राज्य चालवीत असल्याचा आरोप करत सुटले आहेत. विशेष म्हणजे गुजरातच्या दौर्‍यावर जाताना, तेथे जाऊन आल्यानंतर काय आरोप करायचे, ते आधीच जणू ठरविलेले असल्यासारखे, त्यांची टकळी चालली आहे. गुजरातमध्ये पहिल्यांदा प्रवेश करताच त्यांना जणू दैवी साक्षात्कार झाला आणि गुजरातच्या आम आदमीला गेल्या दहा वर्षांत तेथे राहून जे कळले नाही ते अरविंद केजरीवाल यांना गुजरातमध्ये पाऊल टाकताच लक्षात आले आणि ते भ्रष्टाचार! भ्रष्टाचार!! अंबानी अंबानी!!! असे किंचाळत सुटले आहेत. कॉंग्रेस असो की केजरीवाल असोत, मुलायमसिंग असोत की नितीशकुमार असोत, नरेंद्र मोदी यांच्यावर हे लोक जसजसे टीका करत आहेत, तसतशी मोदी आणि भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता मात्र वाढतेच आहे. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड जाहीर केल्यानंतर, संपूर्ण देशातील सामान्य जनतेत मोदी यांच्याबाबत एक प्रचंड आकर्षण आणि चर्चा आहे. मोदी यांच्याबाबत विचार करताना सामान्य माणूस कधीच गुजरातमध्ये ११ वर्षांपूर्वी झालेल्या दंगलींचा विचार करत नाही. सामान्य माणूस गुजरातमधील गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासाचाच विचार करतो. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात गुजरातमध्ये झालेल्या विकासाचा जेव्हा देशातील गुजरातबाहेरील सामान्य माणूस विचार करतो, तेव्हा तो मोदी यांच्यावर होत असलेली विरोधकांची टीका किंवा गुजरात सरकारच्या वतीने अमिताभ बच्चन करत असलेल्या जाहिरातींसारख्या जाहिराती यावरून मत बनवत नाही, तर या लोकांचे कुणी मित्र, गावातील कुणी उद्योजक, व्यापारी, व्यवसायाच्या निमित्ताने गुजरातला जाऊन आल्यानंतर तेथील जे अनुभव सांगतात, त्यावरून तो गुजरातच्या विकासाचा अंदाज करतो. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये काम करून दाखविल्याने, त्यांच्याबद्दल देशाच्या कानाकोपर्‍यात एक उत्सुकता, विश्‍वास जागृत झाला आहे. विशेषत: गेल्या दहा वर्षांत डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्चाखालील कॉंग्रेसच्या राज्यात दर चार दिवसांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ, त्यामुळे महागाईचे संकट, दर काही दिवसांनी बाहेर येणारा भ्रष्टाचार आणि घोटाळे, ठरावीक कालावधीनंतर नियमित होत चाललेल्या शेजारी शत्रुराष्ट्रांच्या कुरापती, ठरावीक कालावधीनंतर देशात कुठेतरी उफाळून येणारा निरपराध लोकांचे जीव घेणारा दहशतवाद आणि या समस्यांवर काहीही न करणारे, निर्णय न घेणारे दिशाहीन मनमोहन सरकार! दिल्लीत लंब्याचौड्या गप्पा आणि भरमसाट आरोप करत आणि त्यापेक्षाही लंबीचौडी आश्‍वासने देत सत्तेत आलेल्या केजरीवाल यांनी ४९ दिवसांत निव्वळ स्टंटबाजी करून जे पलायन केले ते पाहता, आता लोकांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी हाच एकमेव पर्याय आहे, असे दिसत आहे. तीन प्रकारे ही अनुकूलता समोर येते आहे : एक- मोदी जातील तेथे प्रचंड, अभूतपूर्व गर्दीच्या विराट सभा, प्रचंड उत्साह दिसतो आहे. दुसरे- सगळ्या सर्वेक्षणांत वरचेवर मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांची लोकप्रियता वाढताना दिसते आहे. तिसरे म्हणजे- एम. जे. अकबर, किरण बेदी, सत्‌पाल महाराज, चेतन भगत अशा कितीतरी विचारवंत, विरोधक, कलाकार, तटस्थ मंडळी यांचा पाठिंबा भारतीय जनता पक्षाला मिळतो आहे. अनेक छोटे पक्ष भाजपाशी निवडणूकपूर्व मैत्री करायला उत्सुक आहेत. अगदी तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांमध्येही भारतीय जनता पक्षाबाबत उत्सुकता आणि मैत्री करण्याबाबत उत्साह आहे.
मात्र, या वातावरणामुळे कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी यांचा जळफळाट होतो आहे. सत्तेविना कॉंग्रेस, ही कल्पनाच कॉंग्रेसजनांना अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे ते निकराचा विरोध करण्याच्या भूमिकेत आहेत. भारतात अराजक निर्माण करण्याचा विडा उचलून, परदेशी इशार्‍याने काम करणारे आम आदमी पार्टी, केजरीवाल यांना देशात राष्ट्रभक्ती, समाजप्रेम, शिस्त यावर आधारलेले विकासोन्मुख स्थिर सरकार नको आहे. त्यामुळे ही सर्व मंडळी निकराचा प्रयत्न करत, नरेंद्र मोदी यांना बदनाम करायचे, खोटेनाटे आरोप करायचे, तीव्र शब्दांचा वापर करत तेजोभंग करण्याचा प्रयत्न करायचा, असे प्रकार आता मतदानापर्यंत वाढत जाणार आहेत.
निवडणूक प्रचारात सोनिया गांधी यांनी भाषेची पातळी खाली आणली. साध्वी ऋतंभरा यांच्या सभा गाजत असताना, त्यांच्या तर्कशुद्ध मांडणीकडे आणि मुद्यांकडे न पाहता, त्यांना शिवराळ असे संबोधण्याचा डाव मल्टिकम्युनल माध्यमांनी आखला होता. मात्र, सोनिया गांधी यांनी राजकारणात सक्रिय झाल्यापासून जी भाषेची पातळी खाली आणली आहे, त्यावर सगळे मल्टिकम्युनल मूग गिळून गप्प आहेत. सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्या तेव्हा महाराष्ट्रात युतीचे सरकार होते. तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात येऊन, येथे गुंडांचे राज्य चालले आहे, अशी टीका केली होती. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गुजरातमध्ये प्रचार करतानाही सोनिया गांधी यांनी मोदी यांना ‘मौत का सौदागर’ असे संबोधून आपली पातळी खाली आणली होती.
सोनिया गांधींच्या पावलावर पाऊल टाकत, कॉंग्रेसमधील अनेक कुवतहीन मंडळी मोदी यांच्यावर तोंडसुख घेत सुटली आहेत. २००२ च्या गुजरात दंगलीबाबत न्यायालयाने नेमलेल्या सीबीआयच्या विशेष तपासणी पथकाने, या दंगलींशी मोदी यांचा काहीही संबध नसल्याचे अहवालात म्हटले आहे. महात्मा गांधींच्या हत्येचा विषयही असाच राहुल गांधींनी या प्रचारात खोटारडेपणाने आणला आहे. न्यायालयांनी, कॉंग्रेसच्या तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांनी, कॉंग्रेस सरकारने नेमलेल्या कपूर कमिशनने गांधीजींच्या हत्येशी संघाचा दूरान्वयानेही संबंध नाही, असे निष्कर्ष काढलेले असताना, राहुल गांधींनी धडधडीत खोटा आरोप संघावर केला. त्यावर आता संघाच्या कार्यकर्त्यांनी एफआयआर दाखल केला आहे, तरीही या लोकांचे आरोप थांबलेले नाहीत. अस्तित्वाचाच प्रश्‍न असल्याने मंडळी निकराने हल्ले चढवत आहेत. गेल्या काही दिवसांत या लोकांनी कसे तोंडसुख घेतले ते पाहा…
कॉंग्रेसचे मणिशंकर अय्यर यांनी मोदी यांना साप, विंचू, घाणेरडा माणूस, अशा शेलक्या शिव्या दिल्या. दिग्विजयसिंग यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या वेळी मोदी यांच्यासाठी रावण, लहू पुरुष, पाणी पुरुष, असत्य का सौदागर अशा विशेषणांचा वापर केला. कॉंग्रेसचे गुजरात प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनी मोदी यांच्यासाठी ‘गंदी नाली का किडा’ असे घाणेरडे शब्द वापरले. कॉंग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोडवाडिया यांनीही अशाच घाणेरड्या भाषेत मोदी यांना गालिप्रदान केले आहे. कॉंगे्रसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी मोदी यांची तुलना दाऊद इब्राहिमशी करण्याचा पराक्रम केला आहे. रेणुका चौधरी यांनी, निमोनियाच्या व्हायरससारखा व्हायरस, अशी मोदी यांची संभावना केली, तर जयराम रमेश यांनी मोदी यांना भस्मासुर म्हटले. सलमान खुर्शीद यांनी तर अलीकडे मोदी यांना नपुंसक असे म्हणत, पुन:पुन्हा त्या शब्दाचे समर्थन करण्याचाही निर्लज्जपणा केला.
इतक्या खालच्या थराची भाषा वापरण्याचे दोन हेतू आहेत. एक- कॉंग्रेसचे हायकमांड सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चरणी आपल्या निष्ठा वाहणे. दुसरे- अल्पसंख्यकांचे लांगूलचालन करण्यासाठी मोदी यांना शिव्या देणे अपरिहार्य असल्याचा यांचा समज आहे. नितीशकुमार, लालूप्रसाद यादव यांनीही अशाच प्रकारे असभ्य भाषा मोदी यांच्याकरिता वापरली आहे. गुजरातच्या जनतेने तीन वेळा बहुमताने निवडून दिलेल्या एका राज्याच्या मुख्यमंत्र्याचा आपण अशा प्रकारची भाषा वापरून जेव्हा उल्लेख करतो, तेव्हा त्या राज्यातील जनतेचाही अवमान करतो, याचे भान या लोकांना स्वार्थापुढे राहत नाही. देशातील लक्षावधी जनता नरेंद्र मोदी यांचा जयजयकार करत असताना, अशा प्रकारची पातळी घसरलेली भाषा त्यांच्याकरिता वापरणे हा असभ्यपणा भारतीय जनतेला पचणारा नाही. जनता या लोकांना येत्या निवडणुकीत जबरदस्त शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही.
अरविंद केजरीवाल यांचीही सगळी चाल विध्वंसक वृत्तीचे निदर्शक आहे. भारतीय लोकशाही, लोकशाहीवरील लोकांची श्रद्धा, भारतीय व्यवस्था या सगळ्यावर मुळापासून प्रहार करत, अराजक पसरविण्याचा गंडा बांधून निघाल्यासारखे केजरीवाल यांची चाल आहे. या देशात पराभूत झालेले डावे, समाजवादी यांनी केजरीवाल या नव्या नावाने पुन्हा या देशात आपले जाळे पसरविण्याचे कारस्थान केले आहे काय? जगावर आपले कायम नियंत्रण असावे, यासाठी वेगवेगळ्या देशांत अराजक पसरविण्याचे मनसुबे आखणार्‍या जागतिक शक्तींनी केजरीवाल यांना हाताशी धरले आहे काय? असा प्रश्‍न पडतो. आम आदमी पार्टीला परदेशातून किती निधी मिळाला, हे न्यायालयाने विचारले, तरी केजरीवाल महाशय सांगायला तयार नाहीत, मात्र किंचाळणार्‍या आवाजात नरेंद्र मोदींना अंबानीच पैसे देतात, हे कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करण्याचा मात्र केजरीवाल यांचा धडाका चालला आहे. नुकत्याच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपणास स्थिर सरकार नको आहे, पुन्हा एका वर्षांत लोकसभेच्या निवडणुका हव्या आहेत, असे जाहीर मत केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. याचा अर्थ असा की, अमेरिकेला भारतात मोदींचे सरकार नको आहे. पाकिस्तान आणि चीनलाही नको आहे. अमेरिका सीआयएच्या माध्यमातून फोर्ड फौंडेशनसारख्या संस्थांमार्फत केजरीवाल यांना पैसा पोहोचवीत असल्याचे तथ्यही उघड झाले आहे. राखी बिडला यांच्या गाडीला लहान मुलाचा चेंडू लागताच त्यांनी हल्ला झाल्याचा कांगावा केला तसे गुजरात दौर्‍यात गाडीला दगड लागल्याचा कांगावा, हल्ला झाल्याची खोटी ओरड केजरीवाल आणि सिसोदिया यांनी केला. दिल्लीत भाजपा कार्यालयावर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जो हल्ला बोल केला तो कोणत्या लोकशाहीचे दर्शन देणारा होता? उमेदवारीसाठी पैसे घेतले म्हणून आम आदमी पार्टीच्या दोघांना बडतर्फ करावे लागले, दिल्लीतील उमेदवार महेंद्रसिंग यांनी आपले तिकीट परत करताना, राखी बिडला या प्रचार कार्यालय सुरू करण्यासाठी सात लाख रुपये मागत होत्या, असा आरोप केला. केजरीवाल, सिसोदिया यांनी तो आरोप ‘आम्ही चौकशी केली, तसे काही नाही,’ अशा एका वाक्यात निकालात काढला. आपल्या कार्यकर्त्यांवर आरोप झाले की, आपणच न्यायाधीशाच्या भूमिकेत त्यांना क्लीन चिट द्यायची, इतर नेत्यांवर मात्र बिनबुडाचे वारेमाप आरोप करत त्यांची बदनामी करायची. नागपूरमध्ये गडकरी आणि मुत्तेमवार एका उद्योगात भागीदार असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आणि नंतर आम आदमी पार्टीच्या लोकांनी असा आरोप केलाच नव्हता, अशी मखलाशी केली. ही मखलाशी, हा खोटारडेपणा एका बदनामीच्या, अराजक निर्माण करण्याच्या, गोंधळ निर्माण करणार्‍याच्या कारस्थानाचा एक भागच आहे, असे वाटते आहे.
इतरांना विमानात फिरता म्हणून आरोप करायचे स्वत: मात्र खुशाल खाजगी विमानातून जयपूर ते दिल्ली प्रवास करायचा, इतरांना खर्च कुठून करता असे विचारायचे, स्वत: मात्र डिनरसाठी दहा-दहा हजार, वीस-वीस हजार घ्यायचे, सभेला जाण्यासाठी अकरा हजार रुपये घ्यायचे, हे काय आहे?
असल्या अप्रामाणिक, खोटारड्या, अश्‍लाघ्य राजकारणाचा आता शेवट करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी लोकांनी निग्रहाने मतदान करण्याची गरज आहे. आपल्या एका मताने काय होणार? असा विचार न करता, एकेका मताने या बेईमान, असभ्य लोकांचा पराभव होणार आहे, हे जाणून आपले मत वाया घालवू नका.

Short URL: https://vrittabharati.in/?p=12280

Posted by on Mar 24 2014. Filed under प्रहार : दिलीप धारूरकर, संवाद, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in प्रहार : दिलीप धारूरकर, संवाद, स्तंभलेखक (111 of 125 articles)


मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन जगात या घडीला लहान-मोठ्या मिळून ११० मुस्लिम दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. यात अल् कायदासारख्या विश्‍वविख्यात ...

×