|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.38° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 1.42 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.11°C - 30.24°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.7°C - 30.01°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.58°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.91°C - 30.39°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.02°C - 30.38°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

28.04°C - 30.47°C

sky is clear
Home » क्रीडा » भारतासाठी सुवर्ण ठरलेल्या ऑलिम्पिकचा समारोप

भारतासाठी सुवर्ण ठरलेल्या ऑलिम्पिकचा समारोप

आता २०२४मध्ये भेटू पॅरिसला,
टोकियो, ८ ऑगस्ट – कोरोनाच्या सावटाखाली आयोजित ३२ व्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा टोकियोच्या नॅशनल ऑलिम्पिक स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत पार पडला. चला पुढे जाऊ या आणि पुढील २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भेटू या, असा संदेश या सोहळ्याने दिला. १७ दिवस चाललेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा मागोवा घेणार्‍या एका व्हिडिओच्या सादरीकरणाने सांगता सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी डोळे दीपवणारी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
आंतरराष्ट ?ीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्या हस्ते पुढील २०२४ सालचे ऑलिम्पिक यजमानपद भूषविणार्‍या पॅरिसच्या महापौर ऍनी हिलाल्गो यांच्याकडे ऑलिम्पिक ध्वज सोपविण्यात आला. समारोप समारंभात प्रथमच ध्वज हस्तांतरणाच्यावेळी पॅरिस २०२४ ऑलिम्पिकच्या सादरीकरणाचा भाग म्हणून पुढील यजमान फ्रान्सचे राष्ट ?गीत सादर करण्यात आले. क्लो डफ्रेस यांच्या मार्गदर्शनाखालील फ्रान्सच्या नॅशनल ऑर्केस्ट ?ाद्वारे राष्ट ?गीत सादर करण्यात आले. फ्रान्सचा अंतराळवीर थॉमस पेस्केटने अंतराळातून वाजवलेल्या त्याच्या सॅक्सोफोनवरील काही नोट२ससह राष्ट गीताची सांगता केली. चला पॅरिस २०२४ ऑलिम्पिकची सुरुवात करूया! एकत्र, ऑलिम्पिक खेळांचा एक नवीन अध्याय लिहू, असा संदेश यजमान फ्रान्सने यावेळी दिला.
तुम्ही आम्हाला या क्रीडा सामर्थ्याने प्रेरित केले. कोरोना महामारीमुळे तुम्हाला ज्या अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले ते पाहता हे आणखी उल्लेखनीय होते. टोकियो ऑलिम्पिक-२०२० आशा, एकता आणि शांततेचे प्रतीक आहे, अशा शब्दात आयओसी अध्यक्ष थॉमस बाक यांनी आपल्या भाषणातून यजमान जपानचे कौतुक केले. यावेळी पथसंचलनात भारतीय पथकाचा ध्वजवाहक कांस्यपदक पटकावणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया होता. या सोहळ्यात खेळाडूंच्या उपस्थिती संख्येवर कोणतीही मर्यादा नव्हती. सोहळ्यात दहा भारतीय अधिकार्‍यांचा सहभाग होता. रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमानंतर नॅशनल स्टेडियमला एखाद्या पार्कचे स्वरूप प्राप्त झाले. सर्व खेळाडू मैदानावर एकमेकांना भेटले. यावेळी बजरंग पुनिया, दीपक पुनिया व इतर खेळाडू सेल्फी काढण्यात व्यस्त दिसले.
पंतप्रधानांकडून भारतीय खेळाडूंचे अभिनंदन
टोकियो ऑलिम्पिकच्या पदक तालिकेत अमेरिकेने चीनला एका सुवर्णपदकाने मागे टाकले. अमेरिकेने ३९ सुवर्ण, तर चीनने ३८ सुवर्णपदके पटकावलीत. यजमान जपानने २७ सुवणारसह ५८ पदके जिंकून तिसरे स्थान मिळविले. भारताने १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य अशा ७ पदकांसह एकूण ४८ वे स्थान मिळविले. मी भारतीय पथकाचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये केलेल्या शानदार कामगिरीबद्दल अभिनंदन करतो. त्यांनी सर्वोत्तम कौशल्य, सांघिक कार्य आणि समर्पण व्यक्त केले. भारताचे प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक खेळाडू विजेता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले.

Posted by : | on : 9 Aug 2021
Filed under : क्रीडा
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g