|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.46° C

कमाल तापमान : 28.48° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 78 %

वायू वेग : 1.3 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.48° C

Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.94°C - 30.23°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.6°C - 29.81°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.47°C - 29.9°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.78°C - 30.21°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.88°C - 29.97°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

28.06°C - 30.31°C

scattered clouds
Home » क्रीडा » २०२६ विश्वचषकात खेळणे पुढील कारकीर्दीवर अवलंबून : मेस्सी

२०२६ विश्वचषकात खेळणे पुढील कारकीर्दीवर अवलंबून : मेस्सी

ब्यूनस एअर्स, (३ फेब्रुवारी ) – वयोमानामुळे २०२६ सालच्या फिफा विश्वचषकात खेळणे कठीण होईल, परंतु मला फुटबॉल खेळायला आवडते. मी चांगल्या स्थितीत असल्यामुळे फुटबॉलचा आनंद घेत आहे व पुढेही घेत राहील. पुढील विश्वचषक स्पर्धेला अजून खूप वेळ आहे व या विश्वचषकात माझे खेळणे हे माझी पुढील कारकीर्द कशी चालते यावर अवलंबून आहे, असे विश्वचषक विजेत्या अर्जेंटिना संघाचा कर्णधार लियोनेल मेस्सी म्हणाला.
गत वर्षी फिफा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर मेस्सीने नमूद केले होते की, ही माझी शेवटची फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आहे. २०२६ फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा अमेरिका, कॅनडा व मेक्सिकोच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाणार आहे.
या अनुषंगाने डायरिओ ओले या वृत्तपत्राने मेस्सीला पुन्हा तोच प्रश्न विचारला असता त्याने उत्तर दिले की, २०२६ च्या फिफा विश्वचषकाबाबत मी विचार करेल व निर्णय घेईल. मेस्सीचे १३ विश्वचषक गोल हे जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोजच्या विश्वविक‘माशी बरोबरी साधण्यासाठी तीन गोल कमी आहे. कतार विश्वचषकात मेस्सीने सात गोल केले. मेस्सीने आधीच पाच विश्वचषकांमध्ये सहभागी होण्याचा पराक‘म केला आहे.
मला वाटते की मेस्सी पुढील विश्वचषकात खेळू शकेल, मात्र कालांतराने काय घडते यावर बरेच काही अवलंबून असेल. त्याच्यासाठी दरवाजे नेहमीच खुले असतील. तो मैदानावर आनंदी आहे व आमच्यासाठी ते चांगले असेल, असे अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी गत महिन्यात स्पॅनिश रेडिओ कॅल्व्हिया एफएमवर सांगितले होते.

Posted by : | on : 3 Feb 2023
Filed under : क्रीडा
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g