|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.08° C

कमाल तापमान : 30.69° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 52 %

वायू वेग : 5.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.69° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.24°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.63°C - 30.65°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.77°C - 31.02°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.29°C - 31.38°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.45°C - 30.48°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.86°C - 30.01°C

sky is clear
Home » छायादालन, नागरी, राष्ट्रीय, संरक्षण » तुर्कीमध्ये भारताने राबवलेल्या ’ऑपरेशन दोस्त’चे कौतुक

तुर्कीमध्ये भारताने राबवलेल्या ’ऑपरेशन दोस्त’चे कौतुक

-भारतीय सैन्याने तुर्कीमध्ये ६ तासांत बांधले हॉस्पिटल,
अंकारा, (२१ फेब्रुवारी ) – विनाशकारी भूकंपामुळे हाहाकार माजवणार्‍या तुर्कस्तानमध्ये भारताने राबवलेल्या ’ऑपरेशन दोस्त’चे कौतुक होत आहे. तुर्कस्तानमध्ये भारतीय लष्कराने ज्या प्रकारे तातडीने मदत उपलब्ध करून दिली, त्याचे सगळेच चाहते झाले आहेत. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय लष्कराने तुर्कीमध्ये सुमारे ३६०० रुग्णांवर उपचार केले. त्यांनी सांगितले की, तुर्कस्तानचे नागरिक यासाठी मेसेज पाठवून कृतज्ञता व्यक्त करत आहेत. तुर्कस्तानच्या रुग्णांचे म्हणणे आहे की, भारतीय लष्कराने त्यांना अशा वेळी मदत केली, जेव्हा त्यांना खरोखरच गरज होती.
भारतीय लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी सांगितले की, अवघ्या ६ तासांच्या अल्प सूचनेवर तुर्कीमध्ये एक रुग्णालय तयार करण्यात आले. घाईघाईत ३० खाटांचे रुग्णालय करण्यात आले. हा निर्णय वेळेत घेतल्याचे त्यांनी सांगितले. हे फील्ड हॉस्पिटल १४ दिवस चालले. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर तैनात करण्यात आले होते. लष्करप्रमुखांनी भारतीय लष्कराच्या ६० पॅरा फील्ड या वैद्यकीय पथकाचा सत्कार केला. तुर्कस्तानमध्ये मदत पुरवल्यानंतर टीम मायदेशी परतली आहे.
तुर्कस्तानमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर भारताने घाईघाईत त्याला मदत केली होती. त्यासाठी वेगवेगळी पथके पाठवण्यात आली होती. यामध्ये एनडीआरएफच्या जवानांचे पथकही बचाव कार्यासाठी तुर्कीला गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तुर्कीहून परतलेल्या एनडीआरएफ जवानांची भेट घेतली आणि त्यांचे कौतुक केले.

Posted by : | on : 21 Feb 2023
Filed under : छायादालन, नागरी, राष्ट्रीय, संरक्षण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g