किमान तापमान : 28.51° C
कमाल तापमान : 28.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 74 %
वायू वेग : 4 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
28.8°C - 32.02°C
sky is clear28.87°C - 32.93°C
sky is clear29°C - 32.52°C
few clouds28.78°C - 32.42°C
sky is clear27.84°C - 30.17°C
sky is clear27.21°C - 29.62°C
sky is clear=अफझल गुरूचा वाद=
नवी दिल्ली, [२९ एप्रिल] – दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) परिसरात ९ फेब्रुवारी रोजी संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या फाशीला विरोध करताना देण्यात आलेल्या राष्ट्रविरोधी घोषणांच्या घटनेचा तपास करण्यासाठी नेमलेल्या पाच सदस्यीय समितीचा अहवाल विद्यापीठ प्रशासनाने दिल्ली पोलिसांना सादर केला.
या घटनेनंतर देशद्रोहाच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास करणार्या दिल्ली पोलिसांच्या दहशतवादविरोधी विशेष पथकाने विद्यापीठाच्या मुख्य प्रोटेक्टरकडे या अहवालाची मागणी केली होती. विशेष शाखेने अहवालाकरिता आमच्याशी संपर्क केला आणि आम्ही त्यांना तो अहवाल सोपविला, अशी माहिती विद्यापीठाच्या एका अधिकार्याने दिली.
या घटनेनंतर जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सध्या हे तिघेही जामिनावर बाहेर आहेत. चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे विद्यापीठ प्रशासनाने कन्हैया कुमारला दहा हजार रुपये दंड ठोठावला असून, उमर खालिद, अनिर्बान व मुजीब गट्टू या काश्मिरी विद्यार्थ्यांना विविध कालावधीसाठी विद्यापीठातून काढून टाकले आहे. या घटनेची तक्रार करणारा अभाविपचा नेता सौरभ शर्मा यालाही वाहतुकीस अडथळा आणल्याच्या आरोपाखाली दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.