|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.87° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 75 %

वायू वेग : 8.57 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.55°C - 32.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.62°C - 30.34°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.65°C - 30.03°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.69°C - 29.78°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.59°C - 30.39°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

29.01°C - 30.21°C

light rain
Home » पंजाब-हरयाणा, राज्य » अमृतसर येथून पाकिस्तानी ड्रोन जप्त

अमृतसर येथून पाकिस्तानी ड्रोन जप्त

अमृतसर, (२६ सप्टेंबर) – सीमा सुरक्षा दल आणि जिल्हा पोलिसांनी सोमवारी शोध मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील महावा गावातील शेतातून एक पाकिस्तानी ड्रोन जप्त केला आहे. आज (मंगळवार) अमृतसरच्या धौने खुर्द गावातील भातशेतीतून आणखी एक पाकिस्तानी ड्रोन जप्त करण्यात आला आहे. बीएसएफने ड्रोनच्या जप्तीची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स द्वारे शेअर केली आहे. बीएसएफ पंजाब फ्रंटियरच्या म्हणण्यानुसार, ड्रोनची हवेत हालचाल सुरक्षा दलाच्या लक्षात आली, त्यानंतर ड्रोनवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर हे ड्रोन गायब झाले आणि अमृतसर पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम राबवली असता धौणे खुर्द गावातील शेतातून हा हायटेक पाकिस्तानी ड्रोन जप्त करण्यात आला.
काल अमृतसरच्या महावा गावाजवळ एका संशयास्पद ड्रोनची हालचाल दिसली होती. यानंतर बीएसएफ रेंजर्सनी अमृतसर पोलिसांसह शोध मोहीम राबवून शेतातून क्वाडकॉप्टर ड्रोन जप्त केले. बीएसएफच्या म्हणण्यानुसार, क्वाडकॉप्टर ड्रोन चीनमध्ये बनले असून ते पाकिस्तानमधून भारतात पाठवण्यात आले होते. अतिरिक्त तपासणीसाठी ड्रोन फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले. याशिवाय गेल्या महिन्यात अमृतसर आणि तरनतारन गावातून दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन पाकिस्तानी ड्रोनही जप्त करण्यात आले होते.
सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हे ड्रोन जप्त होते. जिथे स्थानिक पोलिसांसह बीएसएफ शोध मोहीम राबवत होते. दरम्यान, अमृतसर जिल्ह्यातील रतन खुर्द गावाजवळील परिसरात पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत घुसलेल्या संशयास्पद उडत्या ड्रोनचा आवाज ऐकू आला. सैनिकांनी घटनास्थळावर गोळीबार सुरू केला. यादरम्यान एका शेतातून बॅटरीसह ड्रोन जप्त करण्यात आला.

Posted by : | on : 26 Sep 2023
Filed under : पंजाब-हरयाणा, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g