किमान तापमान : 28.99° C
कमाल तापमान : 29.3° C
तापमान विवरण : light rain
आद्रता : 79 %
वायू वेग : 6.9 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
28.15°C - 29.5°C
moderate rain26.38°C - 28.42°C
heavy intensity rain26.71°C - 27.46°C
moderate rain27.64°C - 28.22°C
moderate rain27.47°C - 27.97°C
moderate rain27.81°C - 28.7°C
moderate rainआणखी एक आमदार भाजपात दाखल,
नवी दिल्ली, १२ सप्टेंबर – उत्तराखंड कॉंग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या पक्षाचा आणखी एक आमदार आज रविवारी भाजपात दाखल झाला आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील कॉंग्रेसचे आमदार राजकुमार यांनी दिल्लीत भाजपात प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, भाजपा खासदार, राष्ट्रीय प्रवक्ते अनिल बलुनी आणि उत्तराखंड भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीची तयारी करणार्या भाजपाने आधीच धनौल्टी विधानसभेचे आमदार प्रीतम सिंह पंवार यांना पक्षात प्रवेश दिला आहे. आता आणखी एक आमदार भाजपाच्या गळाला लागल्याने कॉंग्रेसला जोरदार धक्का बसला आहे.
कौटुंबिक पृष्ठभूमी कॉंग्रेसची
पुरोलाचे आमदार राजकुमार यांची कौटुंबिक पृष्ठभूमी कॉंग्रेसची आहे. त्यांचे वडील पतिदास यांनी १९८५ ची विधानसभा निवडणूक उत्तरकाशीमधून कॉंग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. मात्र, ते पराभूत झाले होते. राजकुमार यांनी उत्तराखंड वेगळे राज्य म्हणून अस्तित्वात आल्यानंतर भाजपात प्रवेश केला. २००७ मध्ये भाजपाने राजकुमार यांना सहसपूर जागेवरून तिकिट दिले. त्यांनी निवडणूक जिंकली. यानंतर, २०१२ सहसपूर मतदारसंघ सामान्य श्रेणीत आल्यावर त्यांनी २०१२ मध्ये पुरोला जागेवरून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मालचंद विजयी झाले आणि राजकुमार दुसर्या क्रमांकावर राहिले. २०१७ मध्ये ते कॉंग्रेसमध्ये परतले.