किमान तापमान : 27.33° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.7°से. - 30.97°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.35°से. - 30.7°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.27°से. - 30.86°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.52°से. - 31.46°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.53°से. - 30.46°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.82°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशइटानगर, (१३ जुन) – भाजपा नेते पेमा खांडू यांनी पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर चौना मीन यांनी उपमुख्यमत्रीपदाची शपथ घेतली. गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनीही शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. एक दिवस आधी खांडू यांची एकमताने भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती.
केंद्रीय निरीक्षक भाजपा नेते रविशंकर प्रसाद आणि तरुण चुग बुधवारी इटानगरमध्ये पोहोचले होते. यादरम्यान त्यांनी भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड केली. संध्याकाळी खांडू, चुग आणि अनेक आमदारांसह राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) केटी परनाईक यांची भेट घेण्यासाठी राजभवनात पोहोचले होते. यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला.
पेमा खांडू यांचा जन्म २१ ऑगस्ट १९७९ रोजी तवांग येथे झाला. चीनच्या सीमेला लागून असलेल्या तवांग जिल्ह्यातील ग्यांगखार गावातील पेमा खांडू हे मोनपा जमातीचे आहेत. तवांगमधील बोंबा येथील सरकारी माध्यमिक विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर २००० मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. वास्तविक पेमा खांडू यांना राजकारणाचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील दोरजी खांडू हे अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. पेमा खांडू यांनी २००५ मध्ये राजकारणात प्रवेश केला, जेव्हा त्यांना प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली. पण, त्यांचा खरा राजकीय प्रवास सुरू झाला जेव्हा त्यांचे वडील दोरजी खांडू हेलिकॉप्टर अपघातात मरण पावले. दोरजी खांडू हे २००७ ते २०११ पर्यंत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते. यानंतर पेमा खांडू यांनी २०११ मध्ये आपल्या वडिलांच्या विधानसभा मतदारसंघ मुक्तो येथून निवडणूक लढवली आणि विजयी झाले . यानंतर पेमा खांडू यांचा अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. २०१४ मध्ये, माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये पेमा खांडू यांची नगरविकास मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांच्या राजकीय जीवनात मोठे वळण आले.
पेमा खांडू हे भारतातील सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत, त्यांनी वयाच्या ३७ व्या वर्षी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. खांडूपूर्वी अखिलेश यादव हे भारताचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. अखिलेश यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. पेमा खांडू यांना खेळाची आवड आहे. त्यांना फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल या खेळांमध्ये प्रचंड रस आहे. राजकारणात आल्यानंतर त्यांनी खेळाच्या प्रसारासाठी खूप प्रयत्न केले.