Posted by वृत्तभारती
Wednesday, August 7th, 2024
गुवाहाटी, (०७ ऑगस्ट) – बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटना आणि पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर झालेले बदल पाहता सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) देखील पूर्ण सतर्कतेवर आहे. बंगाल, आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये भारत-बांगलादेश सीमेवर नागरिकांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली असून सीमेवरील सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. आसाम, मेघालय आणि त्रिपुरा सरकारांनी सुरक्षा दलांना आणि बांगलादेशच्या सीमेवरील जिल्ह्यांना बांगलादेशातील हिंसाचाराच्या कोणत्याही परिणामास सामोरे जाण्यासाठी हाय अलर्टवर राहण्यास सांगितले आहे. बेकायदेशीर प्रवेश आणि तस्करीच्या...
7 Aug 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, August 6th, 2024
नवी दिल्ली, (०६ ऑगस्ट) – बांगलादेशच्या संकटावर भारताचे बारीक लक्ष आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बांगलादेशबाबत लोकसभा आणि राज्यसभेत बोलणार आहेत. बांगलादेशच्या मुद्द्यावर दुपारी अडीच वाजता राज्यसभेत आणि दुपारी साडेतीन वाजता लोकसभेत बोलणार आहेत. यादरम्यान ते बांगलादेशातील सत्तापालटाच्या संदर्भात भारताच्या भूमिकेवर वक्तव्य करणार आहेत. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. यासोबतच संसदीय कामकाज...
6 Aug 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, June 13th, 2024
इटानगर, (१३ जुन) – भाजपा नेते पेमा खांडू यांनी पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर चौना मीन यांनी उपमुख्यमत्रीपदाची शपथ घेतली. गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनीही शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. एक दिवस आधी खांडू यांची एकमताने भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. केंद्रीय निरीक्षक भाजपा नेते रविशंकर प्रसाद आणि तरुण चुग बुधवारी इटानगरमध्ये पोहोचले होते. यादरम्यान त्यांनी भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून विधिमंडळ...
13 Jun 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 19th, 2024
नवी दिल्ली, (१९ मार्च) – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने अनेक राज्यांमध्ये जागा वाटप केल्या आहेत, मात्र महाराष्ट्रात अद्याप करार झालेला नाही. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत पोहोचले आहेत. ते भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. राज ठाकरे हे दिल्लीतील एका खाजगी हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी सकाळी राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर राज ठाकरे गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला पोहचले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री...
19 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 19th, 2024
– मानहानीच्या खटल्याच्या संदर्भात प्रत्यक्ष हजर राहण्याचे काँग्रेसला निर्देश, नवी दिल्ली, (१८ मार्च) – काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना झारखंडमधील चाईबासा येथील खासदार-आमदार विशेष न्यायालयाने २७ मार्च २०२४ रोजी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या संदर्भात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायाधीश ऋषी कुमार यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आणि त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले. हे प्रकरण २०१८ चे आहे जेव्हा राहुल गांधी...
19 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 17th, 2024
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२४ला संबोधित, नवी दिल्ली, (१७ मार्च) – जेथे संपूर्ण जग अनिश्चिततेच्या भोवर्यात अडकले आहे, तिथे भारताचा विकास वेगाने होत राहील, अशी स्पष्ट भावना आहे. मी जेव्हा जेव्हा अशा कॉन्क्लेव्हमध्ये येतो तेव्हा तुमची अपेक्षा असते की मी खूप मथळे घेऊन निघून जाईन, मी एक अशी व्यक्ती आहे जी हेडलाइनवर नाही तर डेडलाइनवर काम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२४...
17 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 11th, 2024
– मोदी सरकारची महत्वपूर्ण घोषणा, – केंद्र सरकारची अधिसूचना जारी, नवी दिल्ली, (११ मार्च) – केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. गृहमंत्रालयाकडून सीएएची (नागरिकत्व सुधारणा कायदा/ सिटिझनशिप अमेंडमेंट अॅक्ट) अधिसूचना सोमवारी सायंकाळी जारी करण्यात आली आहे. आजपासून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू करण्यात आला आहे. मोदी सरकारने डिसेंबर २०१९ मध्ये संबंधित विधेयकाला मंजुरी दिली होती आणि नंतर राष्ट्रपतींची...
11 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 19th, 2024
गांधीनगर, (१९ जानेवारी) – गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि उत्तर गुजरातमधील विजापूर मतदारसंघाचे आमदार चतुरसिंह जवानजी चावडा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. चावडा यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. राम मंदिराच्या मुद्द्यावर पक्षाच्या भूमिकेवर नाराज असल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. चावडा लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे....
19 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 26th, 2023
– मध्य प्रदेशच्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा, भोपाळ, (२५ डिसेंबर) – मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा मध्य प्रदेश राजभवनात होत आहे. आज राज्यपालांनी आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली. आज सोमवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेऊन मंत्री होणार असलेल्या आमदारांची यादी त्यांना देण्यात आली. कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पक्षाच्या हायकमांडने सर्व विद्यमान आमदारांना शपथविधीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. मुख्यमंत्री यादव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी...
26 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
– अभाविपच्या ६९ व्या राष्ट्रीय अधिवेशनाला गृहमंत्री अमित शहा यांचे संबोधन, नवी दिल्ली, (०८ डिसेंबर) – अभाविपच्या ६९ व्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, मी विद्यार्थी परिषदेचे एक सेंद्रिय उत्पादन आहे, हे मला न घाबरता सांगायचे आहे. आज येथे राष्ट्रीय अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याचा मला किती अभिमान आहे, हे मी तुम्हाला सांगू शकणार नाही. हे फक्त त्या व्यक्तीलाच अनुभवता येईल, ज्याने राजकोट अधिवेशनात पंडालच्या...
8 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
नवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजपा) नेत्रदीपक विजय मिळवला आहे. मात्र, तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावांवर सर्वोच्च नेतृत्वाने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नवीन चेहर्यांची निवड करू शकते. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या नावांची निवड केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मंगळवारी सायंकाळी उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सुमारे साडेचार तास बैठक झाली,...
6 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 3rd, 2023
नवी दिल्ली, (०३ डिसेंबर) – पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंतचा प्रवास हा उत्तर प्रदेशच्या राजकारणातून जातो, असं म्हटलं जातं, पण या प्रवासात हिंदी पट्ट्यातील राज्यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. हिंदी पट्ट्यातील राज्यांवर ज्यांची सत्ता आहे त्यांच्यासाठी लोकसभा निवडणूक सोपी झाली आहे. सत्तेची सेमीफायनल म्हणवल्या जाणार्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपच्या विजयाच्या रूपाने हे अलीकडेच पाहायला मिळाले. या राज्यांमध्ये भाजप पंतप्रधान मोदींना त्यांच्या विजयाचा अभिमान दाखवत आहे....
3 Dec 2023 / No Comment / Read More »