किमान तापमान : 27.64° से.
कमाल तापमान : 28.54° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 3.17 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.54° से.
27.79°से. - 31.2°से.
रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल26.75°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 30.31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.46°से. - 30.28°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.42°से. - 29.88°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.21°से. - 29.64°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादलपुरी, (१३ जुन) – ओडिशात पहिल्यांदाच सरकार स्थापन करणार्या भारतीय जनता पार्टीने सत्तेत येताच आपले पहिले आश्वासन पूर्ण केले आहे. मोहन चरण माझी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतरच त्यांनी पहिले आश्वासन पूर्ण केले. पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत. एवढेच नाही तर चारही दरवाजे उघडल्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी स्वतः उपमुख्यमंत्री केव्ही सिंह देव आणि प्रभावती परिदा यांच्यासोबत गुरुवारी मंदिरात पूजा केली.
पुरीमध्ये बांधलेले भगवान जगन्नाथाचे मंदिर १२व्या शतकातील आहे. काही काळ मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले. भाविकांसाठी एकच गेट उघडे ठेवण्यात आले होते. सत्तेत आल्यास सर्व दरवाजे उघडले जातील, असे आश्वासन भाजपाने निवडणुकीदरम्यान जनतेला दिले होते. आता बुधवारी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री मोहन चरण माळी यांनी पहिले पाऊल जगन्नाथ मंदिराबाबत टाकले आहे. मोहन चरण माळी यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे पुन्हा उघडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि त्यासाठी निधी उभारला.
बैठकीनंतर मुख्यमंत्री मोहन माझी आमदार आणि पक्षाच्या नेत्यांसह जगन्नाथ मंदिरात पोहोचले आणि त्यांनी येथे प्रार्थना केली. मोहन चरण माळी म्हणाले, ’जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याचा प्रस्ताव आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला आणि आज सकाळी ६:३० वाजता मी माझे आमदार आणि पुरीचे खासदार यांच्यासह ’मंगला आरती’ला उपस्थित राहिलो. जगन्नाथ मंदिराच्या विकासासह अन्य कामांसाठी आम्ही मंत्रिमंडळात निधीचा प्रस्ताव ठेवला आहे. राज्याचा पुढील अर्थसंकल्प सादर करताना आम्ही मंदिर व्यवस्थापनासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी देऊ.
१२व्या शतकातील या मंदिराचे दरवाजे नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजेडी सरकारने बंद केले होते. कोविड-१९ महामारीनंतर मंदिराचे चारही दरवाजे बंद करण्यात आले. त्यानंतर भाविकांना एकाच गेटमधून आत प्रवेश करता येत होता व दर्शन घेता येत होते. दरवाजे बंद असल्याने भाविकांची अडचण होत होती. अशा परिस्थितीत मंदिराचे उर्वरित दरवाजेही उघडण्याची मागणी सातत्याने होत होती. भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सर्व मंदिरांचे दरवाजे उघडण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण केले आहे.