किमान तापमान : 26.7° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 2.67 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
24.56°से. - 27.07°से.
रविवार, 24 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.86°से. - 27.92°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 28.82°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर साफ आकाश24.97°से. - 28.72°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.82°से. - 28.32°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.34°से. - 28.71°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, ७ जानेवारी – ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराचे मुख्य आरोपी ताहिर हुसेन याच्या खुलासा विधानाचा हवाला देत दिल्ली पोलिसांनी आपल्या पुरवणी आरोपपत्रात हुसेन, खालिद सैफी आणि उमर खालिद यांच्यात शाहीनबागेत हिंसाचाराचे कट रचण्यासाठी बैठक झाली होती, असा आरोप केला आहे.
ईशान्य दिल्ली हिंसाचार प्रकरणातील पूरक आरोपपत्र करकरदूमा न्यायालयाने मंगळवारी स्वीकारले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान जगासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलीन व्हावी या उद्देशाने उमर खालिद याने राष्ट्रीय राजधानीत जातीय हिंसाचार करण्याचा कट रचला असल्याचा आरोप हुसेन याने तपासादरम्यान केला आहे, अशी माहिती पोलिसांनी या आरोपपत्रात दिली.
रचलेल्या कटानुसार त्यांनी फेब्रुवारीमध्ये हिंसाचार केला होता. खालिद सैफी याच्यामार्फत हुसेनने ८ जानेवारीला उमर खालिद याची भेट घेतली. यावेळी उमर खालिद याने राम जन्मभूमी आणि कलम ३७०च्या मुद्यावर मौन बाळगल्याचा आरोप हुसेनवर केला होता, परंतु नागरिकत्व कायदा बाजूला ठेवण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी मदतही मागितली होती, असे आरोपपत्रात म्हणण्यात आले आहे.
हुसेन याने पोलिसांसमोर खुलासा केला आहे की, तो उमर खालिद यांची भाषणे सतत ऐकत होता. खालिदने आपल्याला पीएफआयचा पाठिंबा असल्याचे सांगत हुसेनला लोकांना हिंसाचारासाठी उद्युक्त करण्यास सांगितले, असे त्यात नमूद केले आहे. यावेळी आरोपी उमर खालिद, ताहिर हुसेन आणि इतर आरोपींनी एकत्रितपणे हा गुन्हा घडवून आणण्यासाठी कट रचला होता, हे दाखविण्यासाठी पुरेसे पुरावे आणि सामग्री असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
हिंसाचाराच्या कालावधीत आरोपी उमर खालिद हा आरोपी हुसेन याच्या संपर्कात होता. आरोपींच्या विरोधात पुरेसे दस्तावेज असून यातून आरोपीने आपल्या घरातून जातीय दंगल, लूटमार आणि संपत्तीची जाळपोळ घडवून आणल्याचे दिसून येते, असे न्यायालयाने नमूद केले.
दिल्लीच्या विविध भागांत जातीय दंगली भडकाविण्याच्या गुन्हेगारी कटात खालिद हा सक्रिय सहभागी होता, असे या आरोपपत्रात ठळकपणे नमूद केलेले आहे.