|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:53 | सूर्यास्त : 18:53
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.59° C

कमाल तापमान : 33.19° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 73 %

वायू वेग : 6.5 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.19° C

Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.4°C - 33.99°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.79°C - 30.51°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.57°C - 30.4°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.71°C - 30.79°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.58°C - 30.87°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 27 May

28.52°C - 30.47°C

light rain
Home » कर्नाटक, राज्य » कर्नाटकातील सीडीप्रकरणात राजकारणासाठी मुलीचा वापर

कर्नाटकातील सीडीप्रकरणात राजकारणासाठी मुलीचा वापर

कॉंग्रेस नेते डी. शिवकुमार यांच्यावर पालकांचा आरोप,
बंगळुरू, २८ मार्च – कर्नाटक सीडी प्रकरणाने रविवारी नवीन वळण घेतले असून, पीडितेच्या पालकांनी कर्नाटक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. शिवकुमार यांनी आपल्या मुलीचा वापर करून राज्यात घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी केला आहे.
भाजपाचे माजी मंत्री रमेश जरकीहोळी यांनीही प्रथमच प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांचे नाव घेत त्यांच्यावर कट रचल्याचा आरोप केला. त्यांनी राजकीय आणि कायदेशीररित्या लढा देण्याची घोषणाही केली. शिवकुमार यांनी मात्र संबंधित मुलीशी काही एक संबंध नसल्याचे म्हणत आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. तर, या प्रकरणातील पीडितेने चौथ्यांदा चित्रफीत प्रसारित करत आपल्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची मागणी केली आहे. या प्रकरणी पीडित महिला आणि तिच्या कुटुंबातील भ्रमणध्वनी संभाषण प्रसारित झाले असून, पीडितेने आपण शिवकुमार यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी जात असल्याचे म्हटले आहे. यानंतर भाजपाने कॉंग्रेसवर चौफेर टीका सुरू केली असून, जरकीहोळी यांच्याविरुद्ध कारस्थान रचल्याचा आरोप केला आहे. जदएसने या प्रकरणी निष्पक्ष पोलिस चौकशीची मागणी केली आहे. तसेच, जरकीहोळी यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगत शिवकुमार यांनी राजीनामा द्यावा आणि कायदेशीर लढाई लढावी, अशी मागणी केली आहे.

Posted by : | on : 28 Mar 2021
Filed under : कर्नाटक, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g