किमान तापमान : 28.7° C
कमाल तापमान : 28.89° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 75 %
वायू वेग : 2.01 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.89° C
28.42°C - 30.46°C
sky is clear27.79°C - 30.46°C
sky is clear27.79°C - 30.02°C
few clouds27.76°C - 30.17°C
sky is clear28°C - 29.92°C
scattered clouds28.13°C - 30.82°C
broken cloudsबंगळुरू, (१४ मे) – कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले असून, त्यानंतर आता ते सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या नावावर पक्षात अद्याप एकमत झालेले नाही. आज होणार्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ गुरुवारी शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, गांधी परिवार आणि राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसनेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सर्व समविचारी पक्षांना निमंत्रण पाठवले आहे. कर्नाटकातील नवीन सरकारच्या स्थापनेचे जवळून निरीक्षण करणार्या सूत्रांनी सांगितले की, कर्नाटक मंत्रिमंडळाची अंतिम रूपरेषा एक-दोन दिवसांत आकार घेईल.