|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.52° C

कमाल तापमान : 28.52° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 64 %

वायू वेग : 3.36 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.52° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.69°C - 30.57°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.14°C - 31.11°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.47°C - 30.63°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.04°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.8°C - 30.07°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

28.08°C - 30.2°C

sky is clear
Home » कर्नाटक, राजकीय, राज्य, राष्ट्रीय » कर्नाटक निवडणूक: भाजपाच्या १८९ उमेदवारांची घोषणा

कर्नाटक निवडणूक: भाजपाच्या १८९ उमेदवारांची घोषणा

– ५२ नव्या चेहऱ्यांना दिली संधी,
नवी दिल्ली, (१२ एप्रिल) – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने मंगळवारी रात्री आपल्या १८९ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. कर्नाटक भाजपाचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान तसेच भाजपा महासचिव तसेच कर्नाटकचे प्रभारी अरुणसिंह यांनी भाजपा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना भाजपाने त्यांच्या परंपरागत शिगावमधून उमेदवारी दिली. भाजपाच्या यादीत ५२ नवीन चेहर्यांचा समावेश आहे. या यादीत ओबीसीच्या ३२, अनुसूचित जातीच्या ३० तर अनुसूचित जमातीच्या १६ उमेदवारांचा समावेश आहे. ८ महिलांनाही भाजपाने उमेदवारी दिली. माजी मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांच्या मुलाला बी. वाय. विजयेंद्रला शिकारपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. भाजपा महासचिव सी. टी. रवी चिकमंगळूर मतदारसंघातून निवडणूक लढवतील. मंत्री आर. अशोक तसेच व्ही. सोमन्ना यांना प्रत्येकी दोन मतदारसंघांतून उमेदवारी देण्यात आली आहे.
कनकपुरा मतदारसंघात अशोक हे काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना टक्कर देतील. याशिवाय पद्मनाभनगरमध्येही भाजपाने अशोक यांना उमेदवारी दिली. वरुण मतदारसंघात व्ही. सोमन्ना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात निवडणूक लढतील. चामराजनगरमधूनही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. आरोग्यमंत्री सुधाकरन चिक्कबल्लापूर तर अन्य मंत्री डॉ. अश्वथनारायण मल्लेश्वरम मतदारसंघातून निवडणूक लढवतील. २०१८ च्या निवडणुकीत भाजपाने १०४ जागा जिंकल्या होत्या.

Posted by : | on : 12 Apr 2023
Filed under : कर्नाटक, राजकीय, राज्य, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g