किमान तापमान : 28.7° C
कमाल तापमान : 28.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 2.01 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
28.28°C - 30.46°C
sky is clear27.79°C - 30.46°C
sky is clear27.79°C - 30.02°C
few clouds27.76°C - 30.17°C
sky is clear28°C - 29.92°C
scattered clouds28.13°C - 30.82°C
broken clouds– सोन्या-हिर्याने भरलेली तिजोरी,
बंगळुरू, (१४ मे) – मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले डी. के. शिवकुमार यांनी कनकापुरा येथून सलग आठव्यांदा ४० हजार मतांनी विजय मिळवला आहे. शिवकुमार यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यांची तिजोरी सोन्या-चांदीपासून हिर्यांनी भरलेली आहे. त्यांना वाहनांपेक्षा आलिशान घड्याळे अधिक आवडतात.
शिवकुमार यांच्या संपत्तीत गेल्या ५ वर्षांत ६८ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१८ मध्ये त्यांची संपत्ती ८४० कोटी रुपये होती, जी आता सुमारे १,४१३ कोटी रुपये झाली आहे. मायनेता या संस्थेच्या मते, त्यांच्या कुटुंबाकडे २७३.४२ कोटींची संपत्ती आहे. त्यांच्यावर सुमारे ५०३ कोटी रुपयांचे कर्जही आहे. निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसने त्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बनवले, तर ते आतापर्यंतचे सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्री होऊ शकतात. शिवकुमार यांची देशातील विविध १२ बँकांमध्ये खाती आहेत, ज्यात त्यांनी त्यांची मालमत्ता जमा केली आहे. मात्र, त्यांची काही बँक खाती त्यांचे भाऊ सुरेश कुमार सांभाळतात.
शिवकुमार यांच्याकडे एकच कार आहे, ज्याची किंमत ८ लाख ३० हजार रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे कारपेक्षा महागडे रोलेक्सचे आलिशान घड्याळ आहे. याशिवाय त्यांच्या तिजोरीत सुमारे तीन कोटी रुपयांचे सोने आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे डायमंड, रुबी असे मौल्यवान रत्नेही संपत्ती म्हणून आहेत.