किमान तापमान : 28.85° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 89 %
वायू वेग : 1.68 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
29.02°C - 32.15°C
sky is clear28.65°C - 31.48°C
sky is clear28.57°C - 30.39°C
sky is clear28.58°C - 30.33°C
broken clouds28.41°C - 30.14°C
broken clouds28.64°C - 30.26°C
light rainअहमदाबाद, ११ सप्टेंबर – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गुजरातमध्ये पुढील वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होत असताना, त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
रूपाणी यांनी आज दुपारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची राजभवनात जाऊन भेट घेतली आणि पदाचा राजीनामा सोपविला. यावेळी त्यांच्यासोबत गुजरात भाजपाचे प्रभारी पुरुषोत्तम रूपाला आणि मनसुख मंडाविया, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि इतर नेते उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मी स्वखुशीने राजीनामा दिला आहे, कुणाचाही माझ्यावर दबाव नाही. गुजरातची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे. माझ्या सहकार्यांचे देखील आभार मानतो. यापुढे पक्ष जी काही जबाबदारी माझ्यावर सोपवेल, ती पार पाडणार आहे.
पक्षात वेळेनुसार जबाबदार्या बदलत असतात. ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. गुजरात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. रूपाणी यांनी २६ डिसेंबर २०१७ रोजी दुसर्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
राजीनाम्यातून वेगळा अर्थ काढू नका
गुजरातची पाच वर्षे सेवा करण्याची संधी भाजपाने मला दिली. राज्यात विकासाचा प्रवाह सातत्याने सुरू राहावा, यासाठी मी प्रयत्न केले. आता पक्ष जी काही जबाबदारी सोपवेल, ती देखील इतक्याच प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. माझ्या राजीनाम्यातून कोणताही वेगळा आणि सोयीचा अर्थ काढण्याची गरजच नाही. जबाबदार्या बदलणे, नवीन जबाबदार्या सोपविणे ही भाजपाची परंपराच राहिली आहे. ही नियमित प्रक्रिया आहे, असे त्यांनी सांगितले.
नवा मुख्यमंत्री पक्षच ठरवेल
आपली जागा कोण घेणार, असे पत्रकारांनी विचारले असता, याबाबतचा निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्वच घेईल. नव्या मुख्यमंत्र्यांची निवड एकमताने केली जाईल, असे सांगताना त्यांनी, कुणाच्याही मतभेदातून किंवा दबावातून राजीनामा दिल्याच्या वृत्ताचे खंडन केले.
नितीन पटेल आघाडीवर
गुजराजच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीच चार नावे घेतली जात आहेत. यात उपमुख्यमंत्री नितीन पटेल, गुजरात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत रघुनाथ पाटील, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि माजी गृहराज्यमंत्री गोवर्धन जफादीया यांची नावे चर्चेत आहेत. यात नितीन पटेल यांचे नाव आघाडीवर आहे.