किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 26.04° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.9°से. - 28.08°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल25.33°से. - 28.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल25.18°से. - 28.76°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.78°से. - 28.39°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.17°से. - 28.51°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 27.12°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादलनवी दिल्ली, ५ जानेवारी – चांदनी चौकातील हनुमान मंदिर पाडण्याच्या मुद्यावरून भाजपा आणि आप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कॉंग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे. या घटनेवरुन परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
चांदनी चौकाच्या सौंदर्यीकरण योजनेंतर्गत मोतीबाजारजवळचे १०० वर्ष प्राचीन हनुमान मंदिर सोमवारी सकाळी उत्तर दिल्ली महानगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात हटवले. मंदिर पाडण्याच्या घटनेच्या विरोधात नागरिकांच्या जमावाने निदर्शने केली, तसेच पाडलेले हनुमान मंदिर त्याच ठिकाणी उभारण्याची मागणी केली. जमावाने परिसरातील दुकानेही बंद केली. त्यामुळे परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला. या घटनेचे पडसाद आज दुसर्या दिवशीही उमटले. विहिंप कार्यकर्त्यांनी आज पुन्हा निदर्शने करत मंदिराची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली.
या घटनेवरुन भाजप आणि आपमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. दिल्ली सरकारच्या गृहमंत्रालयाच्या आदेशावरुन मंदिर पाडण्यात आल्याचा दावा उत्तर दिल्ली महापालिकेचे महापौर जयप्रकाश यांनी केला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कारस्थान रचून मंदिर पाडल्याचा आरोप भाजपाने केला आहे. मनात असते तर हे मंदिर वाचवणे केजरीवाल यांना सहजशक्य होते, पण त्यांनी तसे केले नाही, असे भाजपाने म्हटले. नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेत मंदिर पुन्हा उभारण्याची मागणी भाजपा करणार असल्याचे दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेशकुमार गुप्ता यांनी म्हटले आहे.
हनुमानाचे मंदिर भाजपाने पाडल्याचा आरोप आपने केला आहे. उत्तर दिल्ली महापालिकेत भाजपाची सत्ता आहे, मंदिर पाडण्याच्या घटनेसाठी दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेशकुमार गुप्ता जबाबदार असल्याचे आपने म्हटले आहे. सौंदर्यीकरणाच्या मार्गात येणारे मंदिर पाडण्यास आपण तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र उत्तर दिल्ली महानगरपालिकेने न्यायालयात सादर केले होते, याकडे आपने लक्ष वेधले आहे. मंदिर पाडण्याच्या घटनेत भाजपा आणि आप यांची हातमिळवणी असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.