|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.89° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 1.88 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.15°C - 31.51°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.64°C - 30.86°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.63°C - 29.86°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.62°C - 29.7°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.45°C - 29.61°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.69°C - 29.77°C

light rain
Home » दिल्ली, राज्य » दिल्ली महिलांसाठी असुरक्षितच!

दिल्ली महिलांसाठी असुरक्षितच!

लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये २० टक्क्यांनी वाढ,
नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर – कोरोना संकटानंतर सर्वकाही पूर्वपदावर येत असताना आता नवी दिल्लीत पुन्हा एकदा महिलांवरील गुन्हे वाढू लागले आहेत. या गुन्ह्यांमध्ये ६ ते २० टक्के वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या आकडेवारीनुसार, कोरोना निर्बंथ शिथिल झाल्यानंतर विनयभंग व बलात्काराच्या घटनांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दिल्ली पोलिसांनी ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत १,४२९ लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंदविले आहेत, तर या वर्षी ऑक्टोबरपर्यंत १७२५ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. विनयभंगाच्या घटनांमध्ये २०.४४ टक्क्यांंंंंनी वाढ झाली आहे. या वर्षी ऑक्टोबरपर्यंत विनयभंगाचे २,१५७ गुन्हे दाखल झाले असून, गत वर्षी १,७९१ गुन्हे दाखल झाले होते.
कोरोनानंतर शहरात मोकळीकचा टप्पा सुरू झाल्यानंतर ही वाढ झाली आहे. कोरोना टाळेबंदीमध्ये २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी बलात्काराच्या घटनांमध्ये २८ टक्के घट झाली होती. त्याचप्रमाणे विनयभंगाच्या घटनांमध्ये ३२.१९ टक्क्यांची घट झाली आहे. २०१९ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत २,१६८ लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले. जे गेल्या वर्षी २१ टक्क्यांनी घसरून १,६९९ वर आले. २०२० मध्ये दिल्लीत महिलांचे अपहरण व पळून जाण्याच्या एकत्रित २,३४४ प्रकरणे नोंदविण्यात आली. यावर्षी अशा ३,३४२ प्रकरणांची नोंद झाली आहे.
आकडेवारीनुसार, ९७ टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी पीडितांना ओळखत होते, तर सुमारे २ टक्के लैंगिक अत्याचार अनोळखी व्यक्तींकडून झाल्याची नोंद झाली आहे.
दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता धोरण स्वीकारण्यास सांगितले आहे.
सर्व जिल्हा डीसीपींना त्यांच्या वतीने लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांच्या तपासावर थेट देखरेख करण्यास व पीडित अल्पवयीन असलेल्या प्रकरणांकडे अधिक लक्ष देण्यास सांगितले आहे. ज्या भागात महिलांविरोधात अधिक गुन्हे नोंदविले गेले आहेत, त्या भागाचा नकाशा तयार करण्यासाठी एक अभ्यास गट नियुक्त करण्यात आला, असे एका अधिकार्‍याने सांगितले.

Posted by : | on : 9 Nov 2021
Filed under : दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g