|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 26.99° C

कमाल तापमान : 28.03° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 74 %

वायू वेग : 1.06 Mps

स्थळ : Mumbai, IN

26.99° C

Weather Forecast for
Friday, 03 May

26.99°C - 30.64°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.62°C - 30.93°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.82°C - 31.09°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.3°C - 31.08°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.42°C - 30.7°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.95°C - 30.1°C

sky is clear
Home » कर्नाटक, राज्य » देवेगौडा यांचा जद (सेक्युलर) रालोआत सहभागी

देवेगौडा यांचा जद (सेक्युलर) रालोआत सहभागी

-कर्नाटकात भाजपाची ताकद वाढणार,
नवी दिल्ली, (२३ सप्टेंबर) – पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर कर्नाटकात भाजपाची ताकद वाढणार आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जनता दल सेक्युलर अर्थात जद एस हा पक्ष भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाला. स्वत: देवेगौडा यांनी शुक्रवारी याबाबतची औपचारिक घोषणा केली. पक्षाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा प्रामु‘याने उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील जागावाटपावर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बैठकीनंतर नड्डा म्हणाले की, जदएस आज रालोआत सहभागी झाला. गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कुमारस्वामी यांची भेट घेतली. हा पक्ष रालोआत आल्याने कर्नाटकात आमची ताकद आणखी वाढणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने कर्नाटकात २५ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस आणि जदएसने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. राज्यात लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत.

 

Posted by : | on : 23 Sep 2023
Filed under : कर्नाटक, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g