किमान तापमान : 28.7° C
कमाल तापमान : 28.89° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 75 %
वायू वेग : 2.01 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.89° C
28.42°C - 30.46°C
sky is clear27.79°C - 30.46°C
sky is clear27.79°C - 30.02°C
few clouds27.76°C - 30.17°C
sky is clear28°C - 29.92°C
scattered clouds28.13°C - 30.82°C
broken clouds– प्रशांत किशोर यांनी लगावला टोला!,
पाटणा, (२५ एप्रिल) – जनसुराज पदयात्रेसाठी प्रशांत किशोर संपूर्ण बिहारचा दौरा करीत आहेत. यादरम्यान ते सातत्याने सर्वच पक्षांवर निशाणा साधत आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, तेजस्वी यादव हे लालूप्रसाद यादव यांचे पुत्र नसते, तर देशात अशी कोणतीही नोकरी नाही, जी त्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे मिळाली असती. नितीशकुमार आणि राजद यांचा स्वत:चा ठावठिकाणा नाही. ते लोक काय कोणाला पंतप्रधान करतील, २०२४ मध्ये नितीश कुमार यांची अवस्था चंद्राबाबू नायडूंसारखी होईल.
प्रशांत किशोर यांनी हा शाब्दिक हल्ला अशावेळी केला आहे, जेव्हा नितीश आणि तेजस्वी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. नितीश आणि तेजस्वी यांनी अलिकडेच सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची लखनौमध्ये आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकात्यात भेट घेतली. त्याआधी त्यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे आणि राहुल गांधी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली होती.