|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:53 | सूर्यास्त : 18:53
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.78° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 4.22 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Friday, 24 May

28.86°C - 30.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.6°C - 30.27°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.28°C - 30.47°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 27 May

28.49°C - 30.14°C

light rain
Weather Forecast for
Tuesday, 28 May

28.71°C - 30°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 29 May

28.58°C - 30.41°C

light rain
Home » तामिळनाडू, राज्य » पुडुचेरीतील कॉंगे्रस सरकार कोसळले

पुडुचेरीतील कॉंगे्रस सरकार कोसळले

विश्‍वासमतापूर्वीच मुख्यमंत्र्यांचा राजीनामा,
पुडुचेरी, २२ फेब्रुवारी – आमदारांच्या राजीनामा सत्रामुळे अल्पमतात आलेले पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी आज सोमवारी विश्‍वासमताचा सामना करणयापूर्वी राजीनामा दिला. यामुळे या केंद्रशासित प्रदेशातील कॉंगे्रसचे सरकार कोसळले असून, तिथे आता राष्ट्रपती राजवट लागू होणार का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
बहुमत सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नाही, याची माहिती असल्याने, विधानसभेत विश्‍वासमत सादर करण्यापूर्वीच नारायणसामी यांनी नायब राज्यपाल तमिलीसाई सुंदरराजन् यांची भेट घेतली आणि राजीनामा दिला.
कॉंगे्रस आणि घटक पक्ष असलेल्या द्रमुकच्या काही आमदारांनी राजीनामे दिल्याने सरकारकडे केवळ ११ आमदार शिल्लक राहिले होते. तर विरोधी पक्ष असलेल्या एनआर कॉंगे्रसकडे १४ आमदार आहेत.
सत्तेचा दावा करणार नाही
सरकारने राजीनामा दिला असला, तरी आम्ही सत्तेचा दावा करणार नाही आणि सध्या तरी तशी योजनाही नाही. भविष्यातील रणनीतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती एनआर कॉंगे्रसचे अध्यक्ष एन. रंगास्वामी यांनी दिली.
आता पाच राज्यांमध्येच उरली कॉंगे्रस
पुडुचेरीतील सत्ता गमावल्यानंतर कॉंगे्रस पक्ष आता फक्त पाच राज्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. त्यातही एकहाती सत्ता केवळ पंजाब आणि छत्तीसगडमध्येच असून, राजस्थान, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये कॉंग्रेस मित्रपक्षाच्या मदतीने सत्तेत आहे. त्यातही महाराष्ट्रातील सत्तेत हा पक्ष सर्वांत लहान म्हणून गणला जातो. तिथेच, २० राज्यांमध्ये भाजपाचे एकहाती किंवा युतीचे सरकार आहे. यातील १२ राज्यांमध्ये भाजपा सर्वांत मोठा पक्ष आहे.

Posted by : | on : 22 Feb 2021
Filed under : तामिळनाडू, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g