|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:53 | सूर्यास्त : 18:53
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.11° C

कमाल तापमान : 30.36° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 3.91 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.36° C

Weather Forecast for
Thursday, 23 May

29.29°C - 31.13°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.67°C - 30.39°C

overcast clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.67°C - 30.47°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.65°C - 30.87°C

overcast clouds
Weather Forecast for
Monday, 27 May

28.63°C - 30.66°C

light rain
Weather Forecast for
Tuesday, 28 May

28.62°C - 30.47°C

light rain
Home » कर्नाटक, राज्य » बेळगावची पोटनिवडणूक भाजपाने जिंकली

बेळगावची पोटनिवडणूक भाजपाने जिंकली

बेळगाव, २ मे – बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी निकटचे उमेदवार कॉंग्रेसचे सतीश जारकीहोळी यांचा ५२४० मतांनी पराभव केला. शिवसेनापुरस्कृत महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार तेथे तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला आहे.
केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे येथे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. यात भाजपातर्फे सुरेश अंगडींच्या पत्नी मंगला अंगडी, तर कॉंग्रेसकडून सतीश जारकीहोळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अंगडी आणि जारकीहोळी यांच्यात चुरस पाहायला मिळाली.
भाजपाच्या उमेदवार मंगला अंगडी यांना सर्वाधिक ४ लाख ४० हजार ३२७ मते, तर कॉंग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना ४ लाख ३५ हजार ८७ मते मिळाली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना १ लाख १७ हजार १७४ मते मिळाली.
संजय राऊत तोंडावर आपटले
बेळगावात भाजपाचा उदेमवार विजयी झाल्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत तोंडावर आपटले आहेत. त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना शिवसेनेचा पाठिंबा घोषित केला होता. त्यांनी बेळगावचा दौरा करून या उमेदवारासाठी आयोजित प्रचार सभेत भाजपावर व केंद्र सरकारवर विखारी टीका केली होती व मराठी भाषकांचा मुद्दा उपस्थित करून या निवडणुुकीला प्रादेशिक रंग देण्याचा प्रयत्न केला होता.
दुसरीकडे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी दणदणीत प्रचारसभा घेऊन शिवसेनेची हवाच काढून टाकली आणि आज मतदारांनी भाजपा उमेदवाराला विजयी करीत संजय राऊत यांना अक्षरश: उताणे पाडले.

Posted by : | on : 2 May 2021
Filed under : कर्नाटक, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g