|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.44° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 2.34 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Monday, 20 May

29.05°C - 31.96°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.95°C - 32.13°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.77°C - 30.78°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 23 May

29.01°C - 30.43°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.45°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.89°C - 30.42°C

light rain
Home » गुजरात, राज्य » भूपेंद्र पटेल गुजरातचे मुख्यमंत्री; आज घेणार शपथ

भूपेंद्र पटेल गुजरातचे मुख्यमंत्री; आज घेणार शपथ

अहमदाबाद, १२ सप्टेंबर – भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज रविवारी झालेल्या बैठकीत गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदी भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. त्याला भाजपाच्या उपस्थित आमदारांनी अनुमोदन दिले. पाटिदार समाजावर पकड असलेले भूपेंद्र पटेल अभियंता आहेत. ते उद्या सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी दिली.
२०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत घोटलोडिया मतदारसंघातून भूपेंद्र पटेल यांनी कॉंग्रेसचे उमेदवार शशिकांत पटेल यांचा १,१७,००० मतांनी पराभव केला होता. अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपददेखील त्यांनी भूषवले आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या भूपेंद्र पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषवण्याची संधी मिळाली.
भूपेंद्र पटेल यांच्या निवडीविषयीची माहिती केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. विजय रुपाणी यांच्या उत्तराधिकार्‍याची निवड करण्यासाठी केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंह तोमर आणि प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत आज दुपारी ३ वाजता बैठक झाली. मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर भूपेंद्र पटेल यांनी राजभवनावर राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतली.
अमित शाह यांनी दिल्या शुभेच्छा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात भाजपा विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल भूपेंद्र पटेल यांचे अभिनंदन करताना शुभेच्छा दिल्या.
भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात राज्याच्या विकासाची घोडदौड यापुढेही सुरू राहील. राज्याला विकासाला नवी ऊर्जा आणि वेग मिळेल. सुशासन आणि लोककल्याणात गुजरात कायम आघाडीवर राहील, असा विश्‍वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
दोन दिवसांत मंत्रिमंडळाची घोषणा
पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत सल्लामसलत केल्यानंतर दोन दिवसांत मंत्रिमंडळाची घोषणा केली जाईल, अशी माहिती गुजरात भाजपाचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांनी दिली. उपमुख्यमंत्रिपदाबाबत भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 13 Sep 2021
Filed under : गुजरात, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g