|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.85° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 1.68 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.21°C - 32.15°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.65°C - 31.48°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.57°C - 30.39°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.58°C - 30.33°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.41°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.26°C

light rain
Home » गुजरात, राज्य » भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी; गुजरातचे सतरावे मुख्यमंत्री

भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी; गुजरातचे सतरावे मुख्यमंत्री

गांधीनगर, १३ सप्टेंबर – आमदार म्हणून प्रथमच निवडून आलेले भाजपाचे नेते भूपेंद्र पटेल यांनी आज सोमवारी गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते राज्याचे सतरावे मुख्यमंत्री ठरले आहेत. आज फक्त पटेल यांचाच शपथविधी पार पडला. उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
राजभवनात झालेल्या साध्या समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भूपेंद्र पटेल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाशासित काही राज्यांमधील मुख्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी व नितीन पटेल उपस्थित होते.
विजय रुपाणी यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रविवारी भूपेंद्र पटेल यांची भाजपा विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली होती. स्वत: रुपाणी यांनीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला होता. सायंकाळी राज्यपालांनी पटेल यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार, आज सकाळी त्यांचा शपथविधी पार पडला.
काही मंत्र्यांना वगळण्याची शक्यता
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल याच आठवड्यात आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. या प्रक्रियेत किमान सात ते आठ मंत्र्यांना वगळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. पुढील वर्षी डिसेंबरमध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक होणार असल्याने, मतदारांवर प्रभाव असलेल्या नव्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळात जागा मिळू शकते, असा अंदाज आहे.

Posted by : | on : 13 Sep 2021
Filed under : गुजरात, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g