|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.91° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 3.81 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.32°C - 30.15°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.94°C - 31.58°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.2°C - 30.44°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.88°C - 30.21°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.63°C - 29.87°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.53°C - 29.77°C

sky is clear
Home » नागरी, मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य, राष्ट्रीय » काँग्रेस इस्रायलवरील हल्ल्याचा निषेधही करू शकली नाही: तेजस्वी सूर्या

काँग्रेस इस्रायलवरील हल्ल्याचा निषेधही करू शकली नाही: तेजस्वी सूर्या

रायपूर, (११ ऑक्टोबर) – केवळ मतपेटीच्या राजकारणासाठी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा योग्य निषेधही करू शकली नाही, असा घणाघात भाजपाचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांनी बुधवारी येथे केला. राज्य लोकसेवा आयोगाच्या भरती प्रकि‘येत झालेल्या घोटाळा प्रकरणातही तेजस्वी सूर्या यांनी छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर पत्रकारांशी चर्चा करताना काँग्रेसवर टीका केली. भाजयुमोने आयोजित केलेल्या एका कार्यशाळेला संबोधित करण्यासाठी सूर्या येथे आले होते. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक ७ आणि १७ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत होणार असून, मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होईल.
इस्रायल-हमासमधील संघर्षाच्या दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीने सोमवारी झालेल्या बैठकीत पॅलेस्टाईन लोकांच्या जमीन, स्वशासन आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकारांसाठी आपल्या दीर्घकालीन भूमिकेचा पुनरुच्चार केला तसेच युद्ध तातडीने थांबवून या मुद्यांवर वाटाघाटी करण्यात याव्या, असे म्हटले. हमासच्या मुद्यावर कार्यकारिणीत झालेल्या ठरावावर पक्षात कोणतेच मतभेद नाहीत आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पॅलेस्टिनी लोकांच्या समर्थनाची आठवण काँग्रेसने भाजपाला करून दिली. सत्ताधारी पक्षाने इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख आपल्या ठरावात न केल्याबद्दल टीका केल्यानंतर काँग्रेसने ही भूमिका घेतली होती.
इस्रायलवरील हल्ला आणि भारताने त्याच्या केलेल्या निषेधाबाबत विचारले असता, इस्रायलमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा अभूतपूर्व आणि अत्यंत नृशंस आहे. लहान मुले आणि हजारो लोकांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. आपण पॅलेस्टाईन आणि हमासच्या मुद्यावर गोंधळायला नको. लष्कर-ए-तोयबा किंवा इसिसप्रमाणेच हमास ही प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे. आजच्या सुसंस्कृत जगात दहशतवादासाठी संपूर्ण जगाने एक इंच जागाही देता कामा नये, असे सूर्या यांनी सांगितले.

Posted by : | on : 11 Oct 2023
Filed under : नागरी, मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g