किमान तापमान : 28.91° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 84 %
वायू वेग : 3.81 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
27.32°C - 30.25°C
sky is clear27.94°C - 31.58°C
sky is clear28.2°C - 30.44°C
sky is clear27.88°C - 30.21°C
few clouds27.63°C - 29.87°C
sky is clear27.53°C - 29.77°C
sky is clear– शिवराजसिंह चौहान गरजले,
भोपाळ, (१० सप्टेंबर) – सनातन धर्म हा सर्वांचे कल्याण करणारा आहे. पण काँग्रेसचे मित्रपक्ष सनातन धर्माचा वारंवार अपमान करून डेंग्यू, मलेरिया, कोरोना म्हणून हिणवत आहेत. यापुढे सनातन धर्माचा अपमान कदापि सहन करणार नाही, या शब्दात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी द्रमुक नेते उदयनिधी आणि ए. राजा यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला.
खरगोन जिल्ह्यातील सेंधवा येथे शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या ‘जन आशीर्वाद यात्रे’त ते बोलत होते. सनातन धर्माचा अपमान कोणी सहन करेल का? राजकारणात धर्माला बदनाम करण्याचा काँग्रेसचा डाव कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जग सनातन परंपरा स्वीकारत आहे, असे सांगून शिवराजसिंह चौहान म्हणाले की, ‘वसुधैव कुटुंबकम’ या परंपरेचा एक भाग आहे. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, पण सनातन धर्माचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. काही दिवसांपूर्वी द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन आणि ए. राजा यांनी सनातन धर्माविषयी वादग‘स्त वक्तव्य करून सर्व सनातन्यांचा रोष ओढवून घेतला आहे.