किमान तापमान : 30.08° C
कमाल तापमान : 31.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.46 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.99° C
27.24°C - 31.99°C
sky is clear27.63°C - 30.65°C
sky is clear27.77°C - 31.02°C
sky is clear28.29°C - 31.38°C
sky is clear28.45°C - 30.48°C
sky is clear27.86°C - 30.01°C
sky is clear– हरयाणा विधानसभेचे एकदिवसीय अधिवेशन,
चंदीगड, (१३ मार्च) – हरयाणाचे नूतन मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी बुधवारी विधानसभेच्या एकदिवसीय अधिवेशनात आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. आपल्याकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा त्यांनी केला होता. ४८ आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे पत्रही त्यांनी राज्यपालांना दिले होते.
लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून हरयाणातील भाजपा आणि जननायक जनता पक्षाची (जेजेपी) युती अखेर तुटली. मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर नायबसिंह सैनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सैनी यांच्यासह भाजपा नेते कंवर पाल गुजर, मूलचंद शर्मा, जय प्रकाश दलाल, बनवारी लाल यांच्यासह अपक्ष आमदार रणजितसिंह यांनीही हरयाणाच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आज सकाळी हरयाणा विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. नायबसिंह सैनी यांनी विश्वाससदर्शक ठराव मांडला. यानंतर यावर चर्चा सुरू झाली. एक तास विरोधी पक्ष, तर एक तास सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विश्वासदर्शक ठरावावर मते मांडण्याचा कालावधी निश्चित झाला.
‘जेजेपी’चा व्हिप, पाच सदस्यांचा सभात्याग
हरयाणातील सैनी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावापूर्वी जेजेपीने आपल्या आमदारांना विधानसभेत गैरहजर राहण्यासाठी व्हिप जारी केला. पक्षाने आमदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, हरयाणा विधानसभेतील जेजेपीच्या सर्व सदस्यांना १३ मार्च रोजी विश्वासदर्शक मतदानाच्या वेळी सभागृहातून सकारात्मकपणे अनुपस्थित राहण्याची विनंती केली जात आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानापूर्वी जेजेपीचे आमदार जोगीराम सिहाग, देवेंद्र बबली, रामकुमार गौतम, रामनिवास सूरजखेडा, ईश्वरसिंह हे देखील बाहेर पडले. अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी सभागृहातून सभात्याग केला.
मनोहरलाल खट्टर यांचा आमदारकीचा राजीनामा
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी बुधवारी कर्नाल विधानसभा मतदारसंघातूनही आपण राजीनामा देत असल्याची घोषणा विधानसभेत केली. कर्नाल विधानसभेच्या आमदारपदाचा राजीनामा देत असल्याचे मी जाहीर करतो. नायबसिंह सैनी आजपासून कर्नाल विधानसभेची जबाबदारी स्वीकारतील. यापुढे माझ्यावर दिली जाणारी जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, असे खट्टर यांनी सांगितले.