|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.87° C

कमाल तापमान : 32.28° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 68 %

वायू वेग : 8.57 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.28° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.55°C - 32.99°C

broken clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.62°C - 30.34°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.65°C - 30.03°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.69°C - 29.78°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.59°C - 30.39°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

29.01°C - 30.21°C

light rain
Home » बिहार-झारखंड, राज्य » मोहरमच्या मिरवणुकीत राष्ट्रध्वजाचा अपमान

मोहरमच्या मिरवणुकीत राष्ट्रध्वजाचा अपमान

– तिरंग्यावरील अशोकचक्रऐवजी तलवारीसह उर्दू शब्द,
रांची, (३० जुलै) – मोहरममध्ये झारखंडमधील पलामू येथून राष्ट्रध्वजाची छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. मोहरमच्या मिरवणुकीत तिरंग्यात अशोकचक्रऐवजी उर्दूमध्ये काहीतरी लिहून त्यात तलवारीचे चित्र छापण्यात आले असल्याचा आरोप आहे. काही वेळातच हे छायाचित्र समाज माध्यमावर व्हायरल झाले. आरोपींवर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हे प्रकरण पलामू जिल्ह्यातील चैनपूर पोलिस स्टेशनचे आहे. डाल्टनगंज कल्याणपूर परिसरातील कांक्री मार्गावर २८ जुलै रोजी मोहरमची मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीत डीजे वाजवत चालणार्या काही लोकांच्या हातात तिरंगाही होता. या ध्वजातील इतर सर्व काही राष्ट्रध्वजाप्रमाणेच होत्या, पण अशोकचक्र गायब होते. अशोकचक्रच्या जागी उर्दूमध्ये काही शब्द लिहिले होते आणि खाली तलवारीचे चित्र होते. आजूबाजूच्या लोकांनी या तिरंग्याचे फोटो काढले. काही वेळातच हा फोटो व्हायरल झाला.
भाजपाचे नेते दीपक प्रकाश यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. २८ जुलै रोजी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, पलामू जिल्ह्यातील मोहरम मिरवणुकीत राष्ट्रध्वजाची छेडछाड करणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, अशोकचक्र काढून तिरंगा ध्वजात उर्दू शब्द लिहिणे, हे संविधानाच्या विरोधात आहे आणि राष्ट्राचा अपमान आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तपासासाठी पाठविण्यात आले. परंतु, कोणतीही विशेष माहिती मिळू शकली नाही. फोटो पूर्णपणे स्पष्ट नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पुरावे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पलामूचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक ऋषभ गर्ग यांनी सांगितले.

Posted by : | on : 30 Jul 2023
Filed under : बिहार-झारखंड, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g