|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.08° C

कमाल तापमान : 30.69° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 54 %

वायू वेग : 5.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.69° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.24°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.63°C - 30.65°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.77°C - 31.02°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.29°C - 31.38°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.45°C - 30.48°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.86°C - 30.01°C

sky is clear
Home » उत्तर प्रदेश, नागरी, राज्य, राष्ट्रीय » सचिनने पीएम मोदींना भेट दिली ’टीम इंडियाची जर्सी’

सचिनने पीएम मोदींना भेट दिली ’टीम इंडियाची जर्सी’

वाराणसी, (२३ सप्टेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संसदीय मतदारसंघ बनारसमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. यावेळी भारतीय क्रिकेटमधील काही दिग्गज स्टार्स उपस्थित होते. सचिन तेंडुलकरनेही पीएम मोदींना टीम इंडियाची जर्सी दिली आणि त्यावर एक महत्त्वाचे नाव लिहिले होते. बनारसमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे उत्तर प्रदेशातील तिसरे स्टेडियम असेल. यावेळी माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, कपिल देव, सुनील गावस्कर आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.
पायाभरणी प्रसंगी सचिन तेंडुलकरने पंतप्रधान मोदींना भारतीय संघाची जर्सी भेट दिली. त्यावर ’नमो’ असे लिहिले होते. हे एक खास स्टेडियम असून, भगवान शिव थीम म्हणून बांधले जाईल. फ्लड लाइट त्रिशूलाच्या आकारात असतील. याशिवाय अर्धचंद्राच्या आकाराचे छत असेल. एका बाजूला डमरूचा आकारही असेल. काशीच्या संस्कृतीची झलक इथे पाहायला मिळेल.
याआधी सचिन तेंडुलकरनेही नरेंद्र मोदींना खास जर्सी भेट दिली होती. त्यांनी मोदींना १० नंबरची जर्सी भेट दिली होती. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. सचिन त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय होता. तेंडुलकर १० नंबरची जर्सी घालायचा. उल्लेखनीय आहे की यूपीमध्ये दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्टेडियम आधीपासूनच अस्तित्वात आहेत. कानपूरचे ग्रीन पार्क स्टेडियम जुने आहे. यानंतर लखनऊमध्ये अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम आहे. यंदाचा एकदिवसीय विश्वचषक सामना लखनौच्या स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

Posted by : | on : 23 Sep 2023
Filed under : उत्तर प्रदेश, नागरी, राज्य, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g