किमान तापमान : 28.98° C
कमाल तापमान : 30.32° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 84 %
वायू वेग : 2.84 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.32° C
28.55°C - 31.47°C
overcast clouds28.21°C - 30.3°C
overcast clouds28.45°C - 29.99°C
scattered clouds28.53°C - 29.71°C
broken clouds28.57°C - 29.92°C
light rain28.61°C - 30.12°C
light rainगंगटोक, (१८ ऑक्टोबर) – सिक्कीममधील अचानक आलेल्या पुरात आणखी दोन मृतदेह सापडल्याने मृतांची सं‘या ४० वर पोहोचली आहे, तर सुमारे दोन आठवडे उलटूनही ७६ लोक अद्याप बेपत्ता आहेत, असे अधिकार्यांनी सांगितले. गत ४ ऑक्टोबर रोजीच्या पहाटे ढगफुटीमुळे तिस्ता नदीला आलेल्या महापुराने राज्य उद्ध्वस्त केले आणि सुमारे ८८,००० लोक प्रभावित झाले.
पाकयोंगमध्ये बहुतांश मृतदेह सापडले. सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार (एसएसडीएमए) जिल्ह्यात सापडलेल्या २६ मृतदेहांपैकी १५ नागरिकांचे तर, ११ लष्करी जवानांचे आहेत. मंगनमध्ये चार मृतदेह, गंगटोकमध्ये आठ आणि नामचीमध्ये दोन मृतदेह सापडले, असे अहवालात म्हटले आहे. शेजारच्या पश्चिम बंगालमध्येही अनेक मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह तिस्ता नदीच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. बेपत्ता ७६ लोकांपैकी २८ पाकयोंग, २३ गंगटोक, २० मंगन व पाच नामची येथील आहेत. सध्या राज्यात २० मदत शिबिरे कार्यरत असून, तिथे २,०८० लोक आश्रय घेत आहेत, असे एसएसडीएमएने सांगितले.