|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.19° C

कमाल तापमान : 31.39° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 68 %

वायू वेग : 4.7 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.39° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.32°C - 31.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.98°C - 31.12°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.13°C - 30.39°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.9°C - 30.05°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.63°C - 29.93°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.75°C - 29.94°C

few clouds
Home » राष्ट्रीय, संरक्षण » अमेठीत एके-२०३ च्या निर्मितीस केंद्राची मंजुरी

अमेठीत एके-२०३ च्या निर्मितीस केंद्राची मंजुरी

पाच लाख रायफलींचे होणार उत्पादन,
नवी दिल्ली, ४ डिसेंबर – उत्तरप्रदेशातील अमेठी येथील कोरवा येथे पाच लाख एके-२०३ रायफलींच्या निर्मितीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. हा निर्णय संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला चालणा देणारा आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
उत्तरप्रदेश देशातील संरक्षण उत्पादन केंद्र होण्याच्या मार्गावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. संरक्षण खरेदीचा कल आता मेक इन इंडियाकडे झुकल्याचे यातून परावर्तित होते. पाच लाख एके-२०३ रायफलींच्या उत्पादनासाठी रशियासोबत भागीदारी केली जाईल आणि यातून दोन्ही देशांचे संरक्षण क्षेत्रातील संबंध अधिक बळकट होत असल्याचे दिसून येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून मध्यम, सूक्ष्म आणि लघु आणि संरक्षण क्षेत्रातील इतर उद्योगांना कच्चा माल आणि उपकरणांचा पुरवठा करून व्यावसायिक संधी मिळणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
भारतीय लष्कराचे जवान तीन दशकांपासून वापरत असलेल्या इन्सास रायफलींची जागा ७.६२ मिमी कॅलिबरच्या एके-२०३ रायफली घेणार आहेत. ३०० मीटर्स अंतरापर्यंत प्रभावी मारा करणार्‍या एके-२०३ रायफली वजनाने हलक्या, मजबूत असून, त्या सहजपणे वापरता येतील. त्यामुळे जवानांच्या लढण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे तसेच सद्यःस्थितीतील कारवायांची आव्हाने हाताळणे त्यांना शक्य होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
लष्कराची ताकद वाढणार
या रायफलींमुळे लष्कराच्या दहशतवादविरोधी आणि घुसखोरीविरोधी कारवायांच्या क्षमताही वाढणार आहे. इंडो-रशियन रायफल्स प्रा. लि. (आयआरआरपीएल) या नावाचा विशेष संयुक्त उपक्रम रायफलींच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आला आहे. पूर्वीच्या आयुधनिर्माण मंडळ आणि आताच्या ऍडव्हान्स वेपन ऍण्ड इक्विपमेन्ट, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, रशियातील रोजोनबॉरोनएक्सपोर्ट (आरओई) आणि कलाश्‍निकोव्ह यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.

Posted by : | on : 4 Dec 2021
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g