किमान तापमान : 27.77° C
कमाल तापमान : 28.52° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 66 %
वायू वेग : 3.36 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.77° C
27.49°C - 30.57°C
sky is clear28.14°C - 31.11°C
sky is clear28.47°C - 30.63°C
scattered clouds28.04°C - 30.14°C
sky is clear27.8°C - 30.07°C
sky is clear28.08°C - 30.2°C
sky is clear– नवीन विक्रम होणार,
– दिग्गज गुंतवणुकदाराचा विश्वास,
नवी दिल्ली, (२५ एप्रिल) – बँकिंग संकटामुळे अमेरिकेत आर्थिक मंदी येण्याची शक्यता वाढली आहे. अमेरिकेला मंदीचा तडाखा बसला तर, त्याचा परिणाम जगभरात दिसून येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने पायाभूत सुविधा, जीएसटी, उत्पादनाशी निगडित प्रोत्साहनासारख्या (पीएलआय) केलेल्या सुधारणांचा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिसत आहे, असा विश्वास शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी व्यक्त केला आहे.
अमेरिकेसह विकसित देशांमध्ये मंदीच्या चर्चा असताना विजय केडिया यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक वक्तव्य केले. अमेरिकेत मंदी आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याकडे मोदी यांच्या नेतृत्वातील व्यवहारिक धोरणे आहेत. या कारणामुळेच जागतिक बाजारांमध्ये अनिश्चितता असतानाही देशातील शेअर बाजार सर्वकालीन उच्चांकापासून केवळ पाच ते सहा टक्के दूर असल्याचे केडिया यांनी सांगितले.
शेअर बाजार एक नवीन उच्चांक गाठण्याची तयारी करीत आहे. यापूर्वी निर्देशांकाने डिसेंबर २०२२ मध्ये ६३,५८३ अंकांची सर्वोच्च पातळी गाठली होती. मंदीचा परिणाम जाणवलाच, तर तो अत्यंत कमी प्रमाणात असेल. विजय केडिया यांच्याकडे अभियांत्रिकी, प्रिसिजन कॅमशाफ्ट्स, अफोर्डेबल रोबोटिक अॅण्ड ऑटोमोशन, अतुल ऑटो, नूलॅण्ड लॅबॉरटरीज आणि वैभव ग्लोबलसार‘या कंपन्यांची एक टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी आहे.
अमेरिकेतील व्याजदर वाढीचा परिणाम नाही
अमेरिकी फेडरलने व्याजदरात वाढ केली तरी, त्याचा परिणाम देशातील शेअर बाजारांवर पडणार नाही, असा विश्वास विजय केडिया यांनी व्यक्त केला. पुढील दोन ते तीन वर्षे कर्जदात्यांसाठी चांगले ठरतील, असे त्यांनी बँकिंग क्षेत्राबाबत मत व्यक्त करताना सांगितले. पुढील तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत माहित व तंत्रज्ञान क्षेत्रावर कोणताही परिणाम दिसणार नाही. अमेरिकेतील अर्थव्यवस्था आणि बाजारात नफेखोरी झाल्यास आयटी क्षेत्र गुंतवणुकदारांसाठी नवीन संधी निर्माण करू शकेल, असे केडिया म्हणाले.