|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.16° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 75 %

वायू वेग : 5.58 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.13°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

29.26°C - 31.36°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.9°C - 30.93°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.73°C - 29.71°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.77°C - 29.73°C

light rain
Weather Forecast for
Friday, 24 May

28.7°C - 29.89°C

light rain

अर्थमंत्रालयात पारंपरिक हलवा समारंभाचे आयोजन

अर्थमंत्रालयात पारंपरिक हलवा समारंभाचे आयोजनकोरोनामुळे अर्थसंकल्पाची छपाई नाही, नवी दिल्ली, २३ जानेवारी – अर्थसंकल्पीय प्रक्रियेच्या शुभारंभाचा भाग म्हणून नॉर्थ ब्लॉकस्थित अर्थमंत्रालयात आज शनिवारी पारंपरिक हलवा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी ‘युनियन बजेट मोबाईल ऍप’चे लोकार्पण केले. या हलवा समारंभाला अर्थमंत्री सीतारामन्, अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अर्थमंत्रालयाचे सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. १ फेब्रुवारीला अर्थमंत्री सीतारामन् संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याआधी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जातेे. यावर्षी कोरोना...23 Jan 2021 / No Comment /

यंदाच्या अर्थसंकल्पात मेगा टेक्सटाईल पार्क योजना!

यंदाच्या अर्थसंकल्पात मेगा टेक्सटाईल पार्क योजना!नवी दिल्ली, २० जानेवारी – भारताला जागतिक पातळीवर टेक्सटाईल क्षेत्रातील उत्पादक आणि निर्यात केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या हेतूने यंदाच्या अर्थसंकल्पात मेगा टेक्सटाईल पार्क योजना जाहीर करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत केंद्रीय अर्थ आणि वस्त्रोद्योग मंत्रालय तपशीलवार चर्चा करीत असून, या योजनेंतर्गत टेक्सटाईल पार्कच्या सुविधा स्थापन करण्यासाठी गुंतवणुकदारांना आणि विकसकांना प्रोत्साहन दिली जाण्याची शक्यता आहे. मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याबाबतची शिफारस आम्ही केंद्रीय अर्थमंत्रालयाला केली...20 Jan 2021 / No Comment /

प्रत्यक्ष कराबाबत वाद सोडवण्यासाठी अर्थसंकल्पात उपाययोजना!

प्रत्यक्ष कराबाबत वाद सोडवण्यासाठी अर्थसंकल्पात उपाययोजना!नवी दिल्ली, १८ जानेवारी – प्रत्यक्ष करावरील वादावर तातडीने तोडगा काढण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात नवीन आणि सातत्यपूर्ण चौकट देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रत्यक्ष करावरील वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी किंवा ‘विवाद से विश्‍वास’ या योजनेच्या धर्तीवर पूर्वनिर्दिष्ट मानदंडांसह मध्यस्थ किंवा कायम विवाद निराकरण प्रणालीसारख्या पर्यायांवर केंद्र सरकार विचार करीत आहे, असे सूत्रांनी सांगितले. या अंतर्गत विविध पर्यायांवर विचार करण्यात आला. अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, असे या घडामोडींची...18 Jan 2021 / No Comment /

यंदाच्या अर्थसंकल्पात कर सवलती नाही

यंदाच्या अर्थसंकल्पात कर सवलती नाहीनवी दिल्ली, १३ जानेवारी – केंद्र सरकार १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार असून, यंदाच्या अर्थसंकल्पावर कोरोनाचा प्रभाव राहणार आहे. कोरोना संकटामुळे झालेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी केंद्र काटकसरीचा अर्थसंकल्प सादर करेल. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात कर सवलती मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मागील वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने कर संरचनेत बदल केला होता. त्याचबरोबर कर वजावटी आणि सवलतीशिवाय एक नवी कर संरचना जाहीर केली होती. यंदा मात्र...14 Jan 2021 / No Comment /

आयकर विवरण सादर करण्यास मुदतवाढ

आयकर विवरण सादर करण्यास मुदतवाढनवी दिल्ली, ३० डिसेंबर – केंद्र सरकारने २०१९-२० या वर्षाकरिता आयकर विवरण सादर करण्याची मुदत आज बुधवारी १० जानेवारीपर्यंत वाढविली आहे. करदात्यांना देण्यात आलेली ही तिसरी मुदतवाढ आहे. याशिवाय लेखा परीक्षण अद्याप पूर्ण न झालेल्या कंपनी आणि व्यावसायिकांनाही आयकर विवरण सादर करण्यासाठी १५ फेबु्रवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने याबाबतचे दिशानिर्देश जारी केले आहेत. एकल व्यावसायिक आणि कंपन्यांसाठी आयकर विवरण सादर करण्याची अंतिम मुदत अनुक्रमे ३१ डिसेंबर २०२० आणि...30 Dec 2020 / No Comment /

अर्थसंकल्पपूर्व बैठकांचा समारोप

अर्थसंकल्पपूर्व बैठकांचा समारोपतज्ज्ञांकडून सूचना, रोखे बाजार, विमा क्षेत्रासह अनेक विषयांचा समावेश, नवी दिल्ली, २५ डिसेंबर – आगामी अर्थसंकल्पाच्या निमित्ताने १४ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या बैठकांचा समारोप करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२१ रोजी सादर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पासाठी विविध क्षेत्रातील जाणकारांची मते जाणून घेण्यासाठी बैठकांचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने केले होते. अर्थमंत्र्यांनी या बैठकांचे अध्यक्षपद भूषविले. मंत्रालयाच्या वतीने याद्वारे विविध क्षेत्रातील...26 Dec 2020 / No Comment /

जीएसटी महसुलाची तूट, राज्यांना सहा हजार कोटींची मदत

जीएसटी महसुलाची तूट, राज्यांना सहा हजार कोटींची मदतनवी दिल्ली, २३ डिसेंबर – केंद्र सरकारने वस्तू आणि (सेवाकर जीएसटी) महसुलाची तूट भरून काढण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचा आठवा साप्ताहिक हप्ता नुकताच राज्य सरकारांना वितरित केला आहे. यापैकी ५५१६. ६० कोटी रुपये २३ राज्ये तर ४८६.४० कोटी रुपये केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. जीएसटी अंमलबजावणीमुळे महसुलातील अंदाजित १.१० लाख कोटी रुपयांची अंदाजित तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोबरमध्ये विशेष कर्ज खिडकी योजना सुरू केली. या खिडकीमार्फत राज्ये आणि केंद्रशासित...23 Dec 2020 / No Comment /

भारतात ५५ हजार कोटींची विदेशी गुंतवणूक

भारतात ५५ हजार कोटींची विदेशी गुंतवणूकअर्थव्यवस्थेसाठी आशादायी, नवी दिल्ली, २१ डिसेंबर – कोरोनाच्या संकटकाळात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतात सुमारे ५५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक बाजारातील अतिरिक्त रक्कम आणि विविध केंद्रीय बँका प्रोत्साहनपर पॅकेजच्या आशेवर असताना भारतात विदेशी गुंतवणुकीचा ओघ मात्र कायम आहे. याबाबत जारी आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी अलिकडील काळात भारतीय शेअर बाजारात रोख स्वरूपात ४८,८५८ कोटी आणि रोख्यांच्या स्वरूपात ६,११२ कोटी रुपये लावले. या काळात एकूण गुंतवणूक ५४,९८० कोटी...21 Dec 2020 / No Comment /

नव्या वर्षात आर्थिक व्यवहारांमध्ये मोठे बदल

नव्या वर्षात आर्थिक व्यवहारांमध्ये मोठे बदलमोबाईल क्रमांक, यूपीआय पेमेंट सेवेसाठीही नवे नियम, नवी दिल्ली, २१ डिसेंबर – येत्या नव्या वर्षात दैनंदिन आर्थिक व्यवहारांमध्ये मोठे बदल होणार असून, त्याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट मोठा परिणाम होऊ शकतो. १ जानेवारी २०२१ पासून बँक क्षेत्रापासून विमा ते घरगुती सिलेंडर दरासंबंधी महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत. नव्या वर्षात ५० हजारांहून जास्त रकमेच्या धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू होत आहे. याअंतर्गत ५० हजारांहून जास्त रकमांसंबंधी महत्त्वाच्या माहितीची पुन्हा एकदा पडताळणी केली...21 Dec 2020 / No Comment /

थकीत कर्जांचा आकडा १.५० लाख कोटींवर

थकीत कर्जांचा आकडा १.५० लाख कोटींवरनवी दिल्ली, १५ डिसेंबर – देशातील आठ बड्या बँकांच्या जाणीवपूर्वक थकविलेल्या कर्जांमध्ये चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मोठी वाढ झाली आहे. ट्रान्सयुनियन सिबिलच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते सप्टेंबर या काळात या कर्जांमध्ये ३७ हजार कोटी रुपयांची वाढ झाली असून, यामुळे देशातील एकूण थकीत कर्जे दीड लाख कोटी रुपयांच्या घरात गेली आहेत. सर्वाधिक थकीत कर्ज असणार्‍या बँकांमध्ये भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ...16 Dec 2020 / No Comment /

उच्च कर संकलन, राज्यांच्या कमी वाट्यामुळे केंद्राचा महसूल वाढला

उच्च कर संकलन, राज्यांच्या कमी वाट्यामुळे केंद्राचा महसूल वाढलानवी दिल्ली, ७ डिसेंबर – उच्च कर संकलन आणि राज्यांचा कमी झालेल्या वाट्यामुळे ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्ती झाली आहे. देशात टाळेबंदी लागू झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये प्रथमच केंद्र सरकारचे कर्जबाह्य उत्पन्न देखील वाढल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत केंद्राचा महसूल ४६.७ टक्क्यांनी वाढून तो १.४ लाख कोटी रुपये झाला आहे. ऑक्टोबरमध्ये कर आणि करबाह्य उत्पन्नात ५० टक्के वाढ...7 Dec 2020 / No Comment /

कर्जहप्ता कमी होणार नाही : रिझर्व्ह बँक

कर्जहप्ता कमी होणार नाही : रिझर्व्ह बँकमुंबई, ४ डिसेंबर – कोरोनाचे संकट कायम असतानाही, अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारत आहे. दुसर्‍या सहामाहीत आर्थिक विकासाचा दर चांगला राहील, असा अंदाज व्यक्त करीत, भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जावरील व्याजाचे दर ‘जैस थे’ ठेवण्याचा निर्णय आज शुक्रवारी घेतला. यामुळे विविध कर्जांवरील हप्ता कमी होण्याची शक्यता मावळली आहे. रेपो दर ४ टक्क्यांवरच स्थिर ठेवण्यात आला आहे. सलग तिसर्‍या पतधोरणात व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रपरिषदेत...5 Dec 2020 / No Comment /