किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, ४ डिसेंबर – कोरोनाचे संकट कायम असतानाही, अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारत आहे. दुसर्या सहामाहीत आर्थिक विकासाचा दर चांगला राहील, असा अंदाज व्यक्त करीत, भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जावरील व्याजाचे दर ‘जैस थे’ ठेवण्याचा निर्णय आज शुक्रवारी घेतला. यामुळे विविध कर्जांवरील हप्ता कमी होण्याची शक्यता मावळली आहे.
रेपो दर ४ टक्क्यांवरच स्थिर ठेवण्यात आला आहे. सलग तिसर्या पतधोरणात व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रपरिषदेत पतधोरण जाहीर केले. मागील दोन महिन्यात किरकोळ महागाईत वाढ झाली. त्यामुळे महागाईचा आलेख तूर्त चिंताजनक आहे. मात्र, खरिपातील शेतमाल बाजारात आल्यास आणि हिवाळी भाजीपाल्याची आवक वाढल्यास महागाई आटोक्यात येईल, असा विश्वास शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला. सद्य:स्थितीत किरकोळ महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे, असे त्यांनी सांगितले.
सप्टेंबरमध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीत जीडीपीचा दर नकारात्मक राहिला आहे. मात्र, अर्थव्यवस्थेत झपाट्याने सुधारणा होत आहे. महागाई नियंत्रण आणि विकासाला चालना देण्याबाबत आम्ही कटिबद्ध आहे. चालू तिमाहीत महागाई दर ६.८ टक्के राहील, तर चौथ्या तिमाहीत तो ५.८ टक्के राहण्याचा अंदाज दास यांनी व्यक्त केला.
ठळक वैशिष्ट्ये
– सलग तिसर्यांदा रेपो दर चार टक्क्यांवर स्थिर
– अर्थव्यवस्थेत मोठी सुधारणा अपेक्षित
– तिसर्या तिमाहीत महागाईचा दर ६.८ टक्क्यांवर जाणार
– तरलता वाढविण्यासाठी रिझर्व्ह बँक आणखी पावले उचलणार
– लवकरच आरटीजीएस प्रणाली चोवीस तास उपलब्ध
– कार्डच्या स्पर्शविहीन व्यवहारांची मर्यादा पाच हजारांवर करणार