किमान तापमान : 28.91° C
कमाल तापमान : 30.3° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 75 %
वायू वेग : 3.81 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.3° C
27.32°C - 30.99°C
sky is clear27.94°C - 31.58°C
sky is clear28.2°C - 30.44°C
sky is clear27.88°C - 30.21°C
few clouds27.63°C - 29.87°C
sky is clear27.53°C - 29.77°C
sky is clearनवी दिल्ली, (९ फेब्रुवारी ) – आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या भाषणात एका खास गोष्टीने लक्ष वेधले आणि ते म्हणजे नाण्यांसाठी व्हेंडिंग मशीनची घोषणा. शक्तीकांता दास यांनी सांगितले की, त्यांची क़्युआर कोडवर आधारित कॉईन वेंडिंग मशीन बसवण्याची योजना आहे, त्यासाठी ते पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहेत. गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, भारतीय रिझर्व्ह बँक क़्युआरकोड आधारित नाणे वेंडिंग मशीन लाँच करेल. पायलट प्रोजेक्ट म्हणून १२ शहरांमध्ये ही मशीन्स प्रथम बसवली जातील. या मशिनमधून कोणताही ग्राहक त्याच्या युपीआय अॅपवरून त्यावरचा क़्युआरकोड स्कॅन करून नाणी काढू शकेल आणि त्याच्या बँक खात्यातून ते डेबिट केले जाईल, ज्याप्रमाणे तुम्ही एटीएम मधून बँक नोटा काढता, त्याचप्रमाणे तुम्ही येथून नाणी काढू शकाल. ते यामुळे बाजारात नाणी अधिक सुलभ होतील.
या पथदर्शी प्रकल्पाच्या यशाच्या आधारे, आरबीआय नंतर या मशीन्सद्वारे नाणी वितरीत करण्याची योजना पुढे नेईल. याबाबत बँकांना मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात येणार आहेत. देशाच्या जीडीपीच्या वाढीबाबत, शक्तीकांत दास म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताचा वास्तविक विकास दर ६.४ टक्के असेल असा अंदाज आहे. दास यांच्या मते, एप्रिल-जून २०२३ तिमाहीत ते ७.८ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, जे मागील वर्षी याच कालावधीत ७.१ टक्के होते. याशिवाय, जुलै-सप्टेंबरमध्ये ६.२ टक्के, ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये ६ टक्के आणि जानेवारी-मार्च २०२४ मध्ये ५.९ टक्क्यांच्या तुलनेत ५.८ टक्के वाढीचा अंदाज आहे. शक्तीकांता दास म्हणाले की, भारतीय रुपया इतर आशियाई चलनांपेक्षा अधिक स्थिर आहे. ते म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्था आता काही महिन्यांपूर्वीच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे, परंतु अनेक देशांमध्ये महागाई अजूनही लक्ष्याच्या बाहेरच आहे.