|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.13° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 74 %

वायू वेग : 2.97 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Saturday, 04 May

27.24°C - 29.75°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.35°C - 30.45°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.78°C - 31.16°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.27°C - 30.45°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.83°C - 29.94°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.45°C - 29.78°C

sky is clear
Home » राजकीय, राष्ट्रीय » आप, सपाचा ‘आय.एन.डी.आय.ए ’ला दणका

आप, सपाचा ‘आय.एन.डी.आय.ए ’ला दणका

-बिहार, मध्यप्रदेशात स्वबळावर लढणार,
नवी दिल्ली, (२७ ऑगस्ट) – ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईत होणार्या बैठकीसाठी जोरदार तयारी केली जात असतानाच या आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. एकीकडे आम आदमी पार्टी अर्थात् आपने बिहारमधील निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली तर, दुसरीकडे समाजवादी पार्टी म्हणजे सपाने मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची घोषणा करून आघाडीला दणका दिला.
आपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री संदीप पाठक यांनी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. आप बिहारमध्ये निवडणूक कधी लढवणार, अशी विचारणा लोक करायचे. आता मी या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. बिहारमध्ये आमच्या पक्षाची मजबूत बांधणी नसेल. मात्र, तिथे आमच्यासाठी काम करणार्यांची संख्या खूप जास्त आहे. बिहार संपूर्ण देशाला राजकारण शिकवते, असे संदीप पाठक यांनी सांगितले.
दुसरीकडे सपाने मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यासह त्यांच्या उमेदवारांची सं‘या सहा झाली आहे. विरोधकांची इंडिया आघाडी तयार झाली असून, मध्यप्रदेशात समाजवादी पक्ष काँग्रेससोबत निवडणूक लढणार का, या प्रश्नाला उत्तर देताना सपाचे प्रदेशाध्यक्ष रामायणसिंह पटेल यांनी अशी शक्यता फेटाळून लावली. कोणत्याही राज्यातील आघाडीबाबतचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व घेते. मात्र, मध्यप्रदेशात अशा प्रकारच्या कोणत्याही आघाडीची शक्यता नाही. तथापि, याबाबतचा अंतिम निर्णय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष घेतील, असे पटेल यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

Posted by : | on : 27 Aug 2023
Filed under : राजकीय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g