|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.79° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 2.4 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.55°C - 30.06°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 04 May

28.07°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

28.15°C - 30.43°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.47°C - 30.3°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.59°C - 30°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.19°C - 29.56°C

sky is clear
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » इस्रायलमधील १८ हजार भारतीयांना आणणार

इस्रायलमधील १८ हजार भारतीयांना आणणार

– ‘ऑपरेशनश अजय’ची सुरुवात,
– पहिले विमान आज पहाटे होणार दाखल,
नवी दिल्ली, (१२ ऑक्टोबर) – इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन अजय’ची घोषणा केली आहे. भारतात येण्याची इच्छा असलेल्या भारतीयांना या माध्यमातून परत आणले जाईल. जवळपास १८ हजार भारतीयांची सुटका इस्रायलमधून केली जाईल. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी रात्री एक्सवर पोस्ट शेअर करीत ‘ऑपरेशन अजय’बाबत माहिती दिली. इस्रायलमधून परतण्याची ×इच्छा असलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले जाणार आहे. विशेष चार्टर विमानांची तसेच इतर व्यवस्था केली जाईल. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे जयशंकर यांनी सांगितले.
इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावरून गुरुवारी रात्री नऊ वाजता एक चार्टर विमान जवळपास २३० भारतीयांना घेऊन उड्डाण करणार आहे. ते शुक्रवारी पहाटे देशात दाखल होईल. पहिले नोंदणी करणार्याला भारतात पहिले परतण्याची संधी देण्यात येईल. या विमानाने जे नागरिक परतणार आहेत, त्यांना विमानाचे भाडे द्यावे लागणार नाही. महत्त्वाचे म्हणजे, इस्रायलमध्ये रक्तपात सुरू झाल्यानंतर एअर इंडिया विमान कंपनीने व्यावसायिक उड्डाणे रोखली होती. बेन गुरियन हे इस्रायलचे प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
इस्रायलमध्ये १८ हजार भारतीय
पहिल्या विमानातून जाणार्या भारतीयांच्या यादीचा मेल आम्ही पाठवला आहे. पुढील उड्डाणांबाबत लवकरच माहिती दिली जाईल. इस्रायलमध्ये जवळपास १८ हजार भारतीय आहेत, असे जयशंकर यांच्या घोषणेनंतर इस्रायलमधील भारतीय दूतावासाने स्पष्ट केेले.
नियंत्रण कक्ष स्थापन
इस्रायलमधील परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आम्ही नियंत्रण कक्ष स्थापन केला असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली.
सावधगिरी बाळगण्याच्या सूचना
इस्रायलमधील भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अशी सूचना भारतील दूतावासाने दिली आहे. इस्रायलमधील सद्यःस्थिती पाहता नागरिकांनी सतर्क राहावे तसेच स्थानिक अधिकार्यांच्या सल्ल्यानुसार सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करावे, असे दूतावासाने नागरिकांना सांगितले आहे.
भारतातील ८५ हजार यहुदींचेही वास्तव्य
भारतीयांसाठी इस्रायल आकर्षक देश आहे. तिथे त्यांना चांगल्या वेतनाशिवाय, मोफत भोजन, निवास आणि आरोग्यसुविधा मिळतात. जवळपास हजार भारतीय विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत. इस्रायलमध्ये भारतीय वंशाच्या जवळपास ८५ हजार यहुदींचे वास्तव्यही आहे.

Posted by : | on : 12 Oct 2023
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g