|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.23° C

कमाल तापमान : 31.4° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 77 %

वायू वेग : 1.77 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.4° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 31.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.81°C - 31.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.58°C - 31.35°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.47°C - 30.26°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.66°C - 30.17°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.35°C - 29.99°C

broken clouds
Home » राष्ट्रीय, संरक्षण » ईशान्य सीमेवर भारताची चीनविरोधात युद्धसज्जता

ईशान्य सीमेवर भारताची चीनविरोधात युद्धसज्जता

पिनाक, स्मर्च रॉकेट लॉन्चर तैनात,
नवी दिल्ली, २२ ऑक्टोबर – पूर्व लडाखनंतर आता भारतीय लष्कराने ईशान्येकडील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनच्या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. या सीमेवर कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने चिना सीमेजवळ पिनाक आणि स्मर्च मल्टीपल रॉकेट लॉन्चर तैनात केले आहेत.
अलिकडेच लष्कराने अरुणाचल प्रदेशात सीमेच्या बाजूने तैनाती वाढवली होती. चीनची विस्तारवादी भूमिका संपूर्ण जगाला माहिती आहे. मात्र, त्याचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. अरुणाचल, लडाखद्वारे अतिक्रमणाचा प्रयत्न करीत असतानाच चीनने अगदी उत्तराखंड सीमेकडूनही भारताच्या हद्दीत कुरापाती केल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून चीनने सीमेवर सैन्याची जमवाजमव सुरू केली. त्यांना प्रत्यूत्तर म्हणून भारताने बोफोर्स तोफा तैनात केल्या.०
आता ईशान्य सीमेवरून चीनला हुसकावून लावण्यासाठी पिनाक आणि स्मर्च रॉकेट लॉन्चर तैनात करण्यात आले आहेत. पिनाक शस्त्र प्रणाली ही एक रॉकेट तोफखाना प्रणाली आहे, जी ३८ किमीपर्यंत शत्रूच्या लक्ष्यांना भेदण्यास समर्थ आहे. लष्कराची क्षमता बळकट करण्याच्या उद्देशाने जास्त उंचीच्या क्षेत्रात त्याची तैनाती केली आहे. सहा पिनाक लॉंचर्सची बॅटरी ४४ सेकंदात ७२ रॉकेटचा सल्व्हो फायर करू शकते. हे शेकडो मीटरच्या आत शत्रूच्या टाक्या आणि इतर शस्त्रे नष्ट करू शकते.
विशेष म्हणजे, पिनाक हे संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मित असून, त्याची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थान अर्थात् डीआरडीओमध्ये झाली आहे.

Posted by : | on : 23 Oct 2021
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g